चारधाम यात्रा आता होणार सोयीस्कर! रेल्वेमंत्र्यांनी Video ट्वीट करून दिली माहिती

चारधाम यात्रा आता होणार सोयीस्कर! रेल्वेमंत्र्यांनी Video ट्वीट करून दिली माहिती

भारतात चारधामचे विशेष महत्व आहे. अनेक भक्तांना चारधाम यात्रा पुर्ण करण्याचे स्वप्न असते. मात्र ते थोडे अवघड असल्याने ही यात्रा करण्यात अनेकदा भाविकांकडून मागेपुढे होत असते. मात्र आता भारतीय रेल्वे हे स्वप्न पूर्ण करणार आहे. भारतीय रेल्वे चारधाम क्षेत्रांना जोडण्यासाठी रेल कनेक्टिव्हिटीवर काम करत असून रेल्वेने यासाठी सर्व्हे करण्याचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण केले आहे. ‘चार धाम प्रकल्प’ अंतर्गत केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे रेल्वे जोडली जात आहे, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे.

असे केले रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वे लाखो भाविकांसाठी चारधाम यात्रा सुलभ करणार आहे. उत्तराखंडच्या पवित्र भूमीतील गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथला भेट देण्यासाठी भाविकांना रेल्वेने प्रवास करता येणार आहे,”असे ट्विट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, रेल्वे मार्ग गंगोत्री आणि यमनोत्रीला जाईल. त्याचबरोबर बद्रिनाथ आणि केदारनाथ लवकरच रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल. तसेच या संपूर्ण प्रकल्पातील बहुतेक भाग दुर्गम डोंगराळ भागातील असणार आहे. यासाठी रेल्वेला बऱ्याच ठिकाणी बोगदेही तयार करावे लागतील.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश ते कर्णप्रयागपर्यंत लाइन टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. या १२५ किमी मीटर लांबीच्या लाइनमधील १०५ किमी मीटर ट्रॅक हा बोगद्यातून जाईल. या मार्गाच्या दरम्यान एकूण १२ स्थानके बांधली जात आहेत. रेल्वे स्थानक आणि बोगद्याचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. पाच बोगदे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या व्यतिरिक्त डोईवाला उत्तरकाशी बारकोट रेल्वे मार्गावर रेल्वेने योजना आखली आहे. हा रेल्वे मार्ग १२२ किमी लांबीचा असणार असल्याचे मीडिया अहवालानुसार सांगण्यात आले आहे.


यंदा चिंचपोकळीचा चिंतामणी अवतरणार चांदीच्या रूपात!

First Published on: August 21, 2020 8:05 PM
Exit mobile version