घरमुंबईयंदा चिंचपोकळीचा चिंतामणी अवतरणार चांदीच्या रूपात!

यंदा चिंचपोकळीचा चिंतामणी अवतरणार चांदीच्या रूपात!

Subscribe

गिरणगावातील १०१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) यंदा लोकभावनेचा विचार करून तसेच सध्याची कोरोना सदृश परिस्थिती पाहता यावर्षी मंडळाच्या देव्हार्‍यातील पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करणार आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा रद्द करून ठरावीक पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत ठराविक अंतर ठेवून साधेपणाने पाटपूजन होईल.‌ यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल. भव्य सजावट आणि रोषणाईवर खर्च न करता जमा होणाऱ्या वर्गणीतून शासकीय हॉस्पिटलला वैद्यकिय उपकरणे तसेच गरजूंकरिता रूग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisement -

१०१ कोविड योद्धांचा सन्मान होणार

गिरणगावातील १०१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने (चिंचपोकळीचा चिंतामणी) जन आरोग्य वर्षाचा शुभारंभ सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या शताब्दी वर्ष पुण्यतिथी निमित्त शनिवार दि.१ ऑगस्ट २०२० रोजी मा.अॅड आणि आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराने करण्यात आला.

या रक्तदान शिबिरासाठी एकूण १८८ रक्तदात्यांचे रक्त संकलित करण्यात आले. या रक्तदान शिबिरासाठी वाडिया रूग्णालय रक्तपेढी परळ यांचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. यावर्षी कोरोनाच्या काळात समाजात कोविड योद्धाची भुमिका बजावलेल्या १०१ कोविड योद्धांचा सन्मान करण्यात येणार आहे. मंडळाने कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रू. ३,५१,००० ची मदत केल्याची माहिती मंडळाचे खजिनदार अतुल केरकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

प्रशासनाकडून देण्यात येणा-या सर्व सुचनांचे पालन करूनच यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता पोलिस प्रशासना वर कसल्याही प्रकारचा अतिरिक्त ताण पडणार नाही याची मंडळाकडून दक्षता घेण्यात येईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली.

भक्तांनी गर्दी न करण्याचे मंडळाचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात विभागीय वर्गणीदार यांच्या व्यतिरिक्त इतर भाविकांना मुखदर्शन घेता येणार नाही. उत्सव कालावधीत विभागीय वर्गणीदार यांना नियोजनानुसार ठराविक वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.परंतू चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन सर्व चिंतामणी भक्तांसाठी ऑनलाईन उपलब्ध असेल. त्यामुळे उत्सव काळात ईतर चिंतामणी भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी केले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -