Indian Railways: प्रवाशांनो लक्ष द्या!, रेल्वेने ५६ लांब पल्ल्याच्या गाड्या केल्या रद्द, कोणत्या ते जाणून घ्या

Indian Railways: प्रवाशांनो लक्ष द्या!, रेल्वेने ५६ लांब पल्ल्याच्या गाड्या केल्या रद्द, कोणत्या ते जाणून घ्या

धावत्या ट्रेनखाली उडी घेत तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मोदींकडे व्यक्त केली इच्छा

देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये कमी झाल्याने रेल्वेने पुढील आदेश येईपर्यंत लांब पल्ल्याच्या २८ जोड्या ट्रेन रद्द केल्या आहेत. यामध्ये शताब्दी, राजधानी, दुरंतो आणि वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा समावेश आहे. याबाबत आज उत्तर रेल्वेने एका निवेदनात माहिती दिली आहे. रद्द करण्यात आलेल्या ट्रेनमध्ये ८ जोडी शताब्दी, २ जोडी दुरंतो, २ जोडी राजधानी आणि १ जोडी वंदे भारत एक्स्प्रेस आहे.

रद्द केलेल्या ट्रेनमध्ये नवी दिल्ली- हबीबगंज शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-कालका शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-अमृतसर शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-देहरादून शताब्दी स्पेशल, नवी दिल्ली-काठगोदाम शताब्दी स्पेशल आणि नवी दिल्ली-चंडीगढ शताब्दी स्पेशल या ट्रेनचा समावेश आहे. ९ मेपासून पुढील आदेश येईपर्यंत या ट्रेन रद्द केल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे नवी दिल्ली-देहरादून जनशताब्दी स्पेशल १० मे पासून आणि नवी दिल्ली-उना जनशताब्दी स्पेशन ९ मेपासून ते पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे ने २३ पॅसेंजर ट्रेन केल्या रद्द

मध्य रेल्वेने पण २३ पॅसेंजर ट्रेन रद्द केल्या आहेत. यामध्ये नागपूर-कोल्हापूर स्पेशल ट्रेन २९ जून पर्यंत, सीएसएमटी-कोल्हापूर स्पेशन १ जुलैपर्यंत आणि सीएसएमटी-पुणे स्पेशल ३० जुनपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द केलेल्या ट्रेन कोणत्या?

०२००१/०२००२ हबीबगंज- नवी दिल्ली- हबीबगंज शताब्दी स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२००५ नवी दिल्ली-कालका शताब्दी स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२००६ कालका-नवी दिल्ली शताब्दी स्पेशल ट्रेन १० मेपासून रद्द

०२०११/०२०१२ नवी दिल्ली-कालका-नवी दिल्ली शताब्दी स्पेशल ९ मेपासून रद्द

०२०१३ नवी दिल्ली अमृतसर शताब्दी स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२०१४ अमृतसर- नवी दिल्ली शताब्दी स्पेशल ट्रेन १० मेपासून रद्द

०२०१७/०२०१८ नवी दिल्ली-देहरादून- नवी दिल्ली शताब्दी स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२०२९/०२०३० नवी दिल्ली- अमृतसर-नवी दिल्ली शताब्दी स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२०३९/०२०४० काठगोदाम-नवी दिल्ली-काठगोदाम शताब्दी स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२०४५/०२०४६ नवी दिल्ली-चंडीगढ-नवी दिल्ली शताब्दी स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२०५५ नवी दिल्ली- देहरादून जनशताब्दी स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२०५६ देहरादून-नवी दिल्ली जनशताब्दी स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२०५७ नवी दिल्ली- उना हिमाचल जनशताब्दी स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२०५८ उना हिमाचल- नवी दिल्ली जनशताब्दी स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२२६३ पुणे- हजरत निजामुद्दीन दुरंतो स्पेशल ट्रेन ११ मेपासून रद्द

०२२६४ हजरत निजामुद्दीन- पुणे दुरंतो स्पेशल ट्रेन १० मेपासून रद्द

०२२६५ दिल्ली सराय रोहिल्ला-जम्मूतवी दुरंतो स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२२६६ जम्मूतवी- दिल्ली सराय रोहिल्ली दुरंतो स्पेशल १० मेपासून रद्द

०२४०१ कोटा- देहरादून स्पेशल १० मेपासून रद्द

०२०४२ देहरादून-कोटा स्पेशल ९ मेपासून रद्द

०२४३३ चेन्नई सेंट्रल- हजरत निजामुद्दीन राजधानी स्पेशल १४ मेपासून रद्द

०२४३४ हजरत निजामुद्दीन- चेन्नई सेंट्रल राजधानी स्पेशल १२ मेपासून रद्द

०२४४१ बिलासपुर जं.- नवी दिल्ली राजधानी स्पेशल १३ मेपासून रद्द

०२४४२ नवी दिल्ली- बिलासपुर जं. राजधानी स्पेशल ११ मेपासून रद्द

०२४४५ नवी दिल्ली- श्री माता वैष्णोदेवी कटरा एक्स्प्रेस स्पेशल ९ मेपासून रद्द

०२४४६ श्री माता वैष्णो देवी कटरा- नवी दिल्ली एक्स्प्रेस स्पेशल १० मेपासून रद्द

०२४५५ दिल्ली सराय रोहिल्ला- बीकानेर जं. स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०२४५६ बीकानेर जं.-दिल्ली सराय रोहिल्ला स्पेशल ट्रेन १० मेपासून रद्द

०२४६१ नवी दिल्ली- श्री माता वैष्णो देवी कटरा श्री शक्ति स्पेशल ट्रेन १० मेपासून रद्द

०२४६२ श्री माता वैष्णो देवी कटरा-नवी दिल्ली श्री शक्ति स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०४०२१ दिल्ली सराय रोहिल्ला- जयपुर सैनिक स्पेशल एक्स्प्रेस ट्रेन ११ मेपासून रद्द

०४०२२ जयपुर-दिल्ली सराय रोहिल्ला सैनिक स्पेशल एक्सप्रेस ट्रेन १२ मेपासून रद्द

०४०४१ दिल्ली जंक्शन- देहरादून फेस्टिवल स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०४०४२ देहरादून-दिल्ली जंक्शन फेस्टिवल स्पेशल ट्रेन १० मेपासून रद्द

०४०४७/०४०४८ कोटद्वार- दिल्ली जंक्शन सिद्धबली स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०४५०५/०४५०६ कालका- शिमला- कालका रेल मोटर स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०४५१५ कालका-शिमला फेस्टिवल स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०४५१६ शिमला-कालका फेस्टिवल स्पेशल ट्रेन १० मेपासून रद्द

०४५५३ दिल्ली जंक्शन- दौलतपुर चौक हिमाचल एक्स्प्रेस स्पेशल ट्रेन १० मेपासून रद्द

०४५५४ दौलतपुर चौक-दिल्ली जंक्शन हिमाचल एक्स्प्रेस स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०४६०५ योग नगरी ऋषिकेश- जम्मूतवी एक्स्प्रेस स्पेशल ट्रेन १० मेपासून रद्द

०४६०६ जम्मूतवी- योग नगरी ऋषिकेश एक्स्प्रेस स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०४६०९ ऋषिकेश- श्री माता वैष्णव देवी कटरा हेमकुंड स्पेशल ट्रेन १० मेपासून रद्द

०४६१० श्री माता वैष्णव देवी कटरा-ऋषिकेश हेमकुंड स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

०४६३९/०४६४० साहिबजादा अजीत सिंह (मोहाली)- फिरोजपुर- साहिबजादा अजीत सिंह एक्स्प्रेस स्पेशल ट्रेन ९ मेपासून रद्द

२२४३९/२२४४० नवी दिल्ली- श्री माता वैष्णव देवी कटरा- नवी दिल्ली वंदेभारत ट्रेन ९ मेपासून रद्द

First Published on: May 7, 2021 9:29 PM
Exit mobile version