Coronavirus: येत्या २१ जूनला कोरोना नष्ट होणार; भारतीय वैज्ञानिकाचा अजब दावा

Coronavirus: येत्या २१ जूनला कोरोना नष्ट होणार; भारतीय वैज्ञानिकाचा अजब दावा

जगात आणि देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दरम्यान चेन्नईमध्ये एका वैज्ञानिकाने सूर्यग्रहण आणि कोरोना विषाणू यांच्यात संबंध असल्याचा दावा केला आहे. न्यूक्लिअर आणि अर्थ वैज्ञानिक डॉ. केएल सुंदर कृष्णा यांनी असा दावा केला आहे की, ‘मागच्या वर्षी २६ डिसेंबरला लागलेल्या सूर्यग्रहणाचा संबंध थेट कोरोना विषाणूशी आहे. येत्या २१ जून रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणामुळे कोरोना विषाणूचा नाश होईल.’ याबाबतचे वृत्त दैनिक जागरण वृत्तसंस्थेने दिले आहे.

केएल सुंदर कृष्णा यांचे म्हणणे आहे की, ‘सूर्यग्रहणानंतर उत्सर्जित विखंडन उर्जामुळे पहिल्या न्यूट्रॉन कणाशी संपर्क साधल्यानंतर कोरोना विषाणू तुटला आहे.’ एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, ‘डिसेंबर २०१९ पासून कोरोना विषाणू आपला जीवन नष्ट करण्यासाठी आला आहे. माझ्या मते २६ डिसेंबर शेवटचे सूर्यग्रहण झाल्यानंतर सूर्यमालेत ग्रहांची संरचना बदलली आहे.’

पुढे डॉ, कृष्णा म्हणाले की, ग्रहांच्यामध्ये उर्जा निर्माण झाल्यानंतर जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळला. या बदलामुळे पृथ्वीवर योग्य वातावरण तयार झाले. हे न्यूट्रॉन सूर्याच्या सर्वाधिक विखंडन उर्जामधून बाहेर पडत आहेत. बायो मॉलिक्यूल संरचनाचे म्यूटेशन या विषाणूचा स्त्रोत असू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

डॉ. कृष्णा यांच्या मते, ‘चीनमध्ये पहिल्यांदा म्यूटेशन प्रक्रिया सुरू झाली असावी. या दाव्याचा कोणतेही ठाम पुरावा नाही आहे. एखाद्या प्रयोगामुळे किंवा हेतूपुरस्सर प्रयत्नांसाठी ही प्रक्रिया केली जाऊ शकते. त्यामुळे येणारे सूर्यग्रहण कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण असू शकते. सूर्याच्या किरणांची तीव्रता विषाणू निष्क्रिय करेल. त्यामुळे आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सूर्याचे किरण आणि सूर्यग्रहण हा विषाणूचा नैसर्गिक उपचार आहे’, असा अजब दावा डॉक्टरांनी केला आहे.


हेही वाचा – गर्लफ्रेंडला पाईपावरून भेटायला जाणं एका डॉक्टरला पडले महागात!


 

First Published on: June 15, 2020 4:10 PM
Exit mobile version