गर्भाशय कॅन्सरवर पहिली स्वदेशी लस तयार; लाखो महिलांना मिळणार दिलासा

गर्भाशय कॅन्सरवर पहिली स्वदेशी लस तयार; लाखो महिलांना मिळणार दिलासा

गर्भाशय कॅन्सरपासून संरक्षणासाठी भारतातील पहिली स्वदेशी क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस लसीवर आज औषध नियामक समितीद्वारे निर्णय घेतला जाणार आहे. ही लस सीरम इन्स्टिट्यूड ऑफ इंडियाने तयार केली आहे. ही लस बाजारात लॉन्च करण्यासाठी कंपनीने 8 जून रोजी डीजीसीआयकडे परवानगी अर्ज दाखल केला आहे. या लसीच्या फेज २ आणि फेज ३ च्या क्लिनिकल चाचण्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या लसीला मान्यता मिळाल्यास गर्भाशय कॅन्सरने पीडित महिलांना दिलासा मिळणार आहे. तसेच भारतासाठी देखील ही मोठी गोष्ट असणार आहे. कारण भारताला आत्तापर्यंत गर्भाशय कॅन्सरच्या लसीसाठी इतर देशांवर अवलंबून रहावे लागत होते.

सरकार या लसीचा लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याच्या विचारात आहे. याअंतर्गत 9 ते 14 वयोगटातील मुलींना कर्करोगापासून वाचवण्यासाठी ही लस दिली जाऊ शकते. सध्या गर्भाशय कॅन्सरवरील लस फक्त खाजगी रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहे. मात्र ती खूप महाग असून एक डोसची किंमत 4 हजार रुपयांपर्यंत आहे. दरम्यान या कॅन्सरबाबत लोकांमध्ये जागरुकताही फारच कमी आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा महिलांमध्ये होणारा मोठा आजार आहे. 15 ते 44 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर हा भारतातील दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. यामुळे महिलांच्या ग्रीवाच्या पेशींचे नुकसान होते. ग्रीवा हा गर्भाशयाच्या खाली असलेला छोटा भाग आहे. गर्भाशय ग्रीवामधील कॅन्सर हा सामान्यतः ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे होतो. भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची सुमारे 80-90 हजार प्रकरणे आढळतात, जी जगात सर्वाधिक आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आशा आहे की, या वर्षाच्या अखेरीस ही स्वदेशी गर्भाशय कॅन्सरवरील लस बाजारात आणली जाऊ शकते. लसीच्या मंजुरीसाठी भारताचे औषध नियंत्रक जनरल (DCGI) यांना दिलेल्या अर्जात, सीरम इन्स्टिट्यूटच्या सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी सांगितले की, या लसीचे नाव CERVAVAC असेल. चाचणी दरम्यान त्याचा खूप चांगला परिणाम झाला आहे. सर्व HPV विषाणूंना प्रतिपिंड प्रतिसाद सर्व वयोगटातील स्त्रियांमध्ये बेसलाइनपेक्षा 1000 पट जास्त असल्याचे आढळून आले आहे.


आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना, राऊतांसह हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल


First Published on: June 15, 2022 10:34 AM
Exit mobile version