घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना, राऊतांसह हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल

आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना, राऊतांसह हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल

Subscribe

आदित्य ठाकरे यांनी 24 नोव्हेंबर 2018 आणि सात मार्च 2020 मध्ये अयोध्या दौरा केला होता. यावेळी त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत होते.

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. अयोध्येत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह हजारो शिवसैनिक दाखल झाले आहेत. विशेष रेल्वेने शिवसैनिक रवाना झाले होते. दरम्यान आदित्य ठाकरे मुंबईहून रवाना झाले असून दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत अयोध्यामध्ये दाखल होतील. आदित्य ठाकरे पहिले उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत दाखल होती. यानंतर रस्ते मार्गाने अयोध्यासाठी रवाना होतील आणि श्री राम लल्लाचे दर्शन घेतील.

शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असून हा ते तिसऱ्यांदा अयोध्येत गेले आहेत. तसेच ते एकटे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी 24 नोव्हेंबर 2018 आणि सात मार्च 2020 मध्ये अयोध्या दौरा केला होता. यावेळी त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत होते. मात्र यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत आणि हजारो शिवसैनिक अयोध्यामध्ये दाखल झाले आहेत.

- Advertisement -

संजय राऊत यापूर्वीच अयोध्यात दाखल

शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत अयोध्येत पोहोचले आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या तयारीसाठी संजय राऊत अयोध्येत पोहोचले होते. याशिवाय शिवसैनिकही सोमवारी तीन विशेष गाड्यांमधून अयोध्येला रवाना झाले आहेत. आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा जवळपास सहा तासांचा असणार आहे. हा राजकीय नसून धार्मिक कार्यक्रम असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. आदित्य प्रथम रामललाचे दर्शन घेतील. शरयूच्या काठावर महाआरती होणार आहे. शहरातील इस्कॉन मंदिरातही त्यांचा दर्शन-पूजेचा कार्यक्रम आहे.

- Advertisement -

संध्याकाळी घेणार श्री रामलल्लाचे दर्शन

आदित्य ठाकरे मुंबई विमानतळावरुन यूपीच्या दिशने रवाना झाले आहेत. दरम्यान दुपारी एक वाजता आदित्य ठाकरे पंचशील हॉटेलमध्ये पोहोचतील. दुपारी 3.30 वाजता माध्यमांशी संवाद साधल्यानंतर ते शहरातील रामनगर येथील इस्कॉन मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी 4:45 वाजता जाणार आहेत. यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता ते रामलल्लाच्या दरबारात हजर होतील. येथे पूजा केल्यानंतर, मंदिराच्या बांधकामाच्या ठिकाणी भेट देणार आहे. यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता शरयूच्या काठावर महाआरती करतील.


हेही वाचा : राष्ट्रपती पदाच्या शर्यतीतून शरद पवार बाहेर; विरोधी पक्षांच्या बैठकीत आज नव्या नावावर चर्चा?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -