यंदा सरासरी ९३ टक्के पावसाची शक्यता; स्कायमेटचा अंदाज

यंदा सरासरी ९३ टक्के पावसाची शक्यता; स्कायमेटचा अंदाज

heavy rain

स्कायमेट संस्थेने यंदाच्या मान्सून आगमनाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये ४ जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस पडेल अशी शक्यताही स्कायमेटने वर्तवली आहे. यावर्षी देशातील मान्सून अल निनोच्या प्रभावाखाली राहणार असल्याचे मतही स्कायमेटने व्यक्त केले आहे. तसेच जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आली आहे.

काही राज्यांमध्ये पाऊस कमी 

दरवर्षी, मे महिन्याच्या अखेरिस केरळमध्ये मान्सून दाखल होतो. परंतु यावेळी केरळमध्येही ४ जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लांबवणीवर जाण्याची शक्यता आहे. यातच कर्नाटक, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेशातील आणि गुजरातमधील काही भागांमध्ये कमी पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तसेच देशभरात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडेल, या अंदाजावर स्कायमेट ठाम आहे. तसेच बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये यावेळी कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आले.

देशाच्या चार भागातील पावसाचा अंदाज

स्कायमेट, भारतातील अग्रगण्य हवामान कंपनीने ३ एप्रिल २०१९ रोजी मॉन्सून २०१९ करीत अंदाज जाहीर केलेला असून या हंगामात पाऊस दीर्घकालीन सरासरीपेक्षा ९३% राहणार असे नमूद केले आहे. संपूर्ण भारताचा अंदाज वर्तवल्यानंतर स्कायमेट आता १४ मे २०१९ रोजी देशाच्या चार भागातील पावसाच्या प्रमाणित वितरणाचा अंदाज जाहीर करत आहे. हा विभागीय अंदाज ८% च्या त्रुटीसह देण्यात येत आहे. यावर्षी मॉन्सूनचे वेळेवर आगमन होणार आहे. तथापि, हवामान प्रारूपांच्या अनुसार मॉन्सूनचे आगमन कमकुवत असणार असे दिसत आहे, परिणामी यावर्षी मॉन्सून सुरुवात फारशी उत्साहवर्धक नाही. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांवर मॉन्सूनचे आगमन २२ मे रोजी होईल. केरळात नैऋत्य मौसमी पावसाला ४ जून रोजी सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पूर्वोत्तर भारतातील काही भागांचा देखील यात समावेश असेल. याआधी केरळवर पूर्व-मॉन्सूनच्या जोरदार सरींची अपेक्षा आहे.

First Published on: May 14, 2019 7:28 PM
Exit mobile version