गाफिल राहून चालणार नाही- वायूदल प्रमुख

गाफिल राहून चालणार नाही- वायूदल प्रमुख

बी एस धनोआ,एअर चीफ मार्शल

नुकतेच भारताच्या वायूदलात राफेल विमानांनी भर घालण्यात आली, असे असले तरी देशाने सुरक्षेच्या दृष्टिने अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत आज वायूदलाचे प्रमुख मार्शल बी एस धनोआ यांनी आज दिल्लीतील कार्यक्रमादरम्यान सांगितले. ते म्हणाले की, भारताने आता राफेल विमानाची खरेदी केली असली तरी भारताला गाफिल राहून चालणार नाही. भारताच्या आजूबाजूला असलेले देश हे दूधखुळे नाहीत.त्यांच्याकडेही अनेक नव्या यंत्रणा आहेत. तेव्हा दशाला अधिक मजबूतीची गरज आहे.

 वाचा- राफेल डील विरोधात सोनिया गांधी रस्त्यावर

यासाठी राफेल विमानाची खरेदी

वादग्रस्त ठरलेल्या राफेल विमानाची नौदलात भर पडली. याचे राजकीय पडसाददेखील उमटले पण तरीदेखील ही विमाने नौदलाची ताकद वाढवतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. फायटर जेट राफेल विमान आणि एस-४०० मिसाईल यामुळे वायूदलाची ताकदच वाढेल, असे देखील ते म्हणाले. सध्या देश सुरक्षेचा विचार केला तर चीन सारखा देश शांत बसणारा नाही. त्यामुळे आपल्याला यंत्रणा अधिक सक्षम करणे गरजेचे आहे,असे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले.

काय म्हणाले वायूदल प्रमुख


 

 

 

First Published on: September 12, 2018 3:42 PM
Exit mobile version