भारताची रणनीती! दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाची सुरक्षा काढली

भारताची रणनीती! दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाची सुरक्षा काढली

नवी दिल्ली – खलिस्तानी समर्थकांनी लंडनमधील भारतीय दुतावासाच्या कार्यालयावर हल्ला चढवून भारतीय तिरंग्याचा अपमान केला होता. या कृतीचा निषेध म्हणून आता भारतानेही पावले उचलली आहेत. भारताने आता नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तलय आणि ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे.

ब्रिटिश उच्चायुक्तालय आणि ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरचे बॅरिकेट्स काढून टाकण्यात आले असून बंदुकधारी पोलिसांनाही हटवले आहे. त्यामुळे ब्रिटिश उच्चायुक्तांची सुरक्षा आता त्यांच्याच हातात आहे.

पंजामध्ये खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहच्या विरोधात भारताने मोहिम उघडली आहे. अनेक खलिस्तानी समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्याचा निषेध म्हणून ब्रिटनमधील खलिस्तानी समर्थकांनी काही दिवसांपूर्वी लंडनमधील भारतीय दुतावासाच्या इमारतीवर हल्ला चढवत भारतीय तिरंग्याचा अपमान केला होता. याप्रकरणी भारत सरकारने ब्रिटनच्या भारतातील उपउच्चायुक्तांसमोर तीव्र निषेध व्यक्त केला होता. अखेर आज भारताने खलिस्तानी ब्रिटनविरोधात पाऊल उचलले आहे. ब्रिटनने भारतीय दुतावासांना संरक्षण न दिल्याने भारतानेही त्यांच्या ब्रिटन उच्चायुक्तालयाचे संरक्षण काढून घेतले आहे.

First Published on: March 22, 2023 3:28 PM
Exit mobile version