इंडोनेशिया विमान दुर्घटना : ‘त्या’ विमानाचा पायलट भारतीय

इंडोनेशिया विमान दुर्घटना : ‘त्या’ विमानाचा पायलट भारतीय

भव्ये सुनेजा (सौ - टाईम्स ऑफ इंडिया)

आज पहाटे इंडोनेशियाच्या जकार्ता विमानतळाहून उड्डाण केलेले प्रवासी विमान अवघ्या १३ मिनिटांत समुद्रात कोसळले. लायन्स एअर जेटच्या या विमानाचा पायलट भारतीय असल्याची माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त जाहीर केले आहे. भव्ये सुनेजा असे या पायलटचे नाव आहे. हे विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे. भव्ये अद्याप सापडलेला नसल्याने तो जिवंत आहे की मृत हे समजू शकलेले नाही. उड्डाणानंतर काही वेळाने या विमानाचा एयर ट्राफिक कंट्रोलरशी संपर्क तुटला त्यामुळे विमान क्रॅश झाले. हे विमान जकार्ता येथून पेंगकल पिनांगला जाणार होते.

कोण आहे भव्ये?

भव्ये हा ३१ वर्षाचा पायलट आहे. वयाच्या २१ व्या वर्षापासून तो विमान चालवत आहे. २०११ सालापासून भव्ये लायन्स एअरवेज या कंपनीत पायलट म्हणून काम करतोय. भव्ये मुळचा दिल्लीवासी आहे. तो दिल्लीच्या मयुर विहार परिसरातील रहिवाशी आहे. त्याल गेल्या काही महिन्यांपासून भारताची ओढ लागली होती. मला भारतात पोस्टिंग द्या अशी मागणी त्याने त्याच्या वरिष्ठांकडे केली होती. त्याची मागणी लायन्स जेट एअरवेज पूर्ण करत नसल्यामुळे तो एका भारतीय विमान कंपनीत रुजू होणार होता.

विमान कंपनी म्हणते…

दुर्घटनाग्रस्त प्रवासी विमान हे लायन्स एअर जेट या कंपनीचे आहे. लायन्स एअर जेट कंपनीचे भव्येबाबत चांगलं मत आहे. ‘आम्हाला कोणत्याही परिस्थितीत भव्ये हवा आहे. आम्हाला तो हवा आहे. तो जिवंत असावा अशी आम्ही सगळेच प्रार्थना करतोय’.

वाचा – पवारांच्या तिसर्‍या पिढीचं ठाकरेंना आव्हान

घटना काय?

जकार्ता येथून लायन एअरच्या ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ या प्रवासी विमानाने सकाळी ६.२० वाजता उड्डाण केले. उड्डाणानंतर केवळ १३ मिनिटातच या विमानाचा एयर ट्राफिक कंट्रोलरशी संपर्क तुटला त्यामुळे विमान क्रॅश झाले. या विमानामध्ये १७८ प्रवासी होते. तसेच या विमानामध्ये दोन पायलट आणि ८ क्रू मेंबर्सदेखील असल्यामुळे तब्बल १८८ लोक बेपत्ता आहेत. इंडोनेशियाच्या समुद्रात विमान बुडालेल्या प्रवाश्यांचा शोध सुरू आहे. ते जिवंत आहेत की मृत याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

First Published on: October 29, 2018 1:11 PM
Exit mobile version