Statue of Equality जगातील दुसऱ्या सर्वाधिक उंच पुतळ्याचं २ फेब्रुवारीला उद्घाटन

Statue of Equality जगातील दुसऱ्या सर्वाधिक उंच पुतळ्याचं २ फेब्रुवारीला उद्घाटन

जगातील सर्वाधिक उंच प्रतिमा म्हणून बहुमान मिळालेल्या ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चं उद्घाटन २ फेब्रुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. रामानुज संप्रदायाचे विद्यमान अध्यात्मिक प्रमुख त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा या सोहळ्याचं निमंत्रण दिलं. श्री रामानुजाचार्य स्वामी यांच्या १ हजाराव्या जयंतीनिमित्त आयोजित रामानुज सहस्त्राब्दी सोहळ्यात या प्रतिमेचं उद्घाटन होईल.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय. श्री रामानुजाचार्य स्वामी यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने हा सोहळा होतोय. हैदराबादजवळ असलेल्या शमशाबादमध्ये उभारण्यात आलेल्या आश्रमात या प्रतिमेच्या अभिषेकासह सोहळा होईल. विशेष बाब म्हणजे स्वामींची २१६ फूट उंचीची प्रतिमा बनवण्यात आली आहे. श्री रामानुजाचार्यांनी भक्तांसाठी त्यांच्या देवतांच्या पूजनाच्या अधिकारांची रक्षा व्हावी, यासाठी अथक प्रयत्न केले होते. म्हणून त्यांच्या मूर्तीला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी नाव देण्यात आलंय.

१ हजार होमकुंड आणि २ लाख किलो गाईचं तूप

रामानुज सहस्त्राब्दी सोहळ्यात लोककल्याणाच्या हेतूने सहस्रहुंदात्माका लक्ष्मी नारायण यज्ञ केला जाणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी १ हजार ३५ होमकुंड तयार केले जाताहेत. त्यात सुमारे दोन लाख किलो एवढं गाईचं तूप वापरलं जाणार आहे. हे ठिकाण दिव्य साकेत म्हणून लवकरच जगप्रसिद्ध अध्यात्मिक केंद्र म्हणून नावारुपास येईल, असा मानस संयोजकांनी व्यक्त केला. तब्बल १ हजार कोटी रुपये खर्चून हा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुतळ्याच्या उभारणीत १ हजार ८०० टन लोखंडाचा वापर करण्यात आलाय.

First Published on: September 18, 2021 12:28 AM
Exit mobile version