विमा धारकांसाठी आनंदाची बातमी! कोरोना लसीकरणानंतर त्रास झाल्यास विमा कंपनी देणार खर्च

विमा धारकांसाठी आनंदाची बातमी! कोरोना लसीकरणानंतर त्रास झाल्यास विमा कंपनी देणार खर्च
कोरानाच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण जग त्रस्त झाले असतांनाच लोक वाट पाहत होती ते कोरोना वॅक्सिनची. अनेक मोठ-मोठ्या कंपन्या वॅक्सिन बनवण्यासाठी रिसर्च करत होत्या. शेवटी कोरोना लस बाजारात आली आणि टप्या-टप्याने  लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  परंतू लसीकरणाचे अनेक साइडईफेक्टस जसे की ताप ,खोकला,सर्दी,अंग दुखणे नागरिकांना जाणवू लागले आहेत. तर काही जणांना हॉस्पिटलमध्येही दाखलही व्हावे लागले.अनेकांच्या मनात लसीकरणाविषयी संभ्रम निर्माण झाला होता.त्याचबरोबर कोरोनामुळे बिघडलेल्या आर्थिक घडीमुळे लोक प्रचंड त्रस्त झाले होते.
अशातच आता विमा धारकांसाठी  IRDAI (Insurance Regulatory and Development Authority)  कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  लसीकरणानंतर काही  साइडईफेक्टस जाणवल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास विमा कंपनीकडू़न उपचाराचा खर्च दिला जाणार आहे. भारतीय विमा नियामक मंडळ आणि विकास प्राधिकरणातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक लोकांनी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना  कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर होणाऱ्या आजाराचा खर्च  विमा कंपनीद्वारे मिळणार की नाही याबाबत शंका होत्या. त्याचप्रमाणे अनेक प्रश्न देखिल उपस्थित झाले. मात्र IRDAI ने आता  याबाबत स्पष्टता केली आहे.

ज्या विमाधारकांकडे आरोग्य विमा कवच असेल त्यांना लसीकरणादरम्यान आरोग्य समस्या उद्भभवल्यास त्या व्यक्तीचा खर्च विमा कंपनीद्वारे कॅशलेस करण्यात येणार आहे. अर्थात यात विामा कंपनीच्या ज्या अटी असतील त्याचे पालन विमा धारकांना कराव लागणार आहे. ग्राहकांना सरकारी विमा कंपनी एलआयसीने कोरोना संकटाचा सामना करत असलेल्या विमाधारकांसाठी सेटलमेंट प्रक्रिया अगदी सुलभरित्या करण्यात आली आहे. जर विमाधारकांची पॅालिसी मॅच्यूअर झाली असेल आणि त्या संबंधित कागदपत्र विमाधारकांना कोणत्याही शाखेत जमा कराता येणार,असे विमा कंपन्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – CoronaVirus : मुंबईत आणि मॉलमध्ये अँटीजन चाचणीशिवाय प्रवेश बंदी

First Published on: March 19, 2021 7:36 PM
Exit mobile version