Intas pharma करतेय देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपीची लस; लवकरच होणार मानवी चाचणी

Intas pharma करतेय देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपीची लस; लवकरच होणार मानवी चाचणी

Intas pharma तयार करतेय देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपीची लस

देशात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. दररोज हजारो कोरोना रूग्णांची नोंद केली जात आहे. त्याचबरोबर जगातील कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी लस शोधण्यात येत आहे. दरम्यान, इंटास फार्मा देशातील पहिल्या प्लाझ्मा थेरपी लससाठी एका महिन्यात मानवी चाचणी सुरू करणार आहे. सध्या जगात कोरोना विषाणूवर कोणतेही अचूक औषध किंवा लस नाही. यासाठी अनेक देश कोरोना विषाणूच्या लसीवर काम करत आहेत. बरेच देश कोरोना लस बनवत आहेत, असा दावाही करत आहेत. त्याच वेळी, कोरोना व्हायरसवरील उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपी देखील खूप प्रभावी मानली जात आहे.

दरम्यान, देशातील आघाडीच्या औषध कंपन्यांपैकी एक असलेल्या इंटास फार्मास्युटिकलने प्लाझ्मा थेरपीप्रमाणेच एक लस विकसित करण्यास सुरवात केली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही लस वापरल्यानंतर रुग्णाला कोविड -१९ साठी प्लाझ्मा थेरपी देण्याची गरज भासणार नाही.

इंटास मेडिकल अॅण्ड रेग्युलेटरी अफेयर्सचे प्रमुख डॉ. आलोक चतुर्वेदी म्हणाले की, कोरोना रोगासाठी देशात असं पहिलं औषध तयार केलं जात आहे. हे पूर्णपणे स्वदेशी आहे. Hyperimmune Globullin या औषधास ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. यासाठी गुजरात आणि देशातील इतर कोविड स्पेशॅलिटी हॉस्पिटलसह क्लिनिकल चाचण्या घेण्यात येणार आहेत.

डॉ. चतुर्वेदी यांनी असेही सांगितले की, प्लाझ्मा थेरपीचा उपयोग कोरोनावर उपचार करण्यासाठीही केला जात आहे. त्यामध्ये अंदाजे ३०० मिलीग्राम प्लाझ्मा देण्यात आला आहे. त्याचा शरीरावर काय परिणाम होत आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कोविडच्या कोणत्याही पेशंटसाठी हायपरिम्यून ग्लोब्युलिन ३० मिलीग्राम डोस पुरेसा असतो. हे आतापर्यंत चाचणीत सिद्ध झाले आहे. पुढील महिन्याभरात या औषधाची मानवी चाचणी सुरू होणार आहे. हे औषध मानवी प्लाझामधूनच तयार केले गेले आहे, म्हणूनच त्याचा परिणाम एका महिन्यात दिसण्यास मदत होईल. औषधाचे प्रमाणपत्र आणि ते तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया घेण्यासाठी आणखी तीन महिने लागणार आहेत. ज्यानंतर ते बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


भारतात सर्वात स्वस्त कोरोनाची २ औषधं लॉन्च! जाणून घ्या, किती आहे किंमत
First Published on: August 28, 2020 9:10 AM
Exit mobile version