घरCORONA UPDATEभारतात सर्वात स्वस्त कोरोनाची २ औषधं लॉन्च! जाणून घ्या, किती आहे किंमत

भारतात सर्वात स्वस्त कोरोनाची २ औषधं लॉन्च! जाणून घ्या, किती आहे किंमत

Subscribe

ड्रग कंट्रोल ऑफ इंडीया डीजीसीआयची मंजुरी

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस आणि औषध तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान कोरोनाच्या उपचारांबाबत एक सकारात्मक माहिती आहे. एफडीसी लिमिटेड कंपनीनं कोविड १९ च्या फेविपीरावीर या औषधाचे दोन वेरिएंट लॉन्च केले आहेत. त्यातील एका औषधांचे नाव पीएफएफएलयू आणि फेविंजिया असे सांगितले जात आहे.

ड्रग कंट्रोल ऑफ इंडीया डीजीसीआयची मंजुरी

कोरोनाचा संसर्ग झाल्यावर सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर हे औषध वापरले जाणार आहे. लाईव्ह मिंटच्या अहवालानुसार एफडीसीनं दिलेल्या माहितीनुसार ड्रग कंट्रोल ऑफ इंडीया डीजीसीआयनं फेविपीरावीरच्या वापराला मंजूरी दिली आहे. हे एक ओरल एंटीव्हायरल औषध आहे. कोरोना व्हायरसची हलकी, मध्यम आणि सौम्य स्वरुपातील लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी हे औषध प्रभावी आहे.

- Advertisement -

अशी असेल एक टॅबलेटची किंमत

आगामी काही काळात हे औषध संपूर्ण भरातात हे औषध उपलब्ध होणार आहे. या औषधाच्या एक टॅबलेटची किंमत ५५ रुपये इतकी आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. तर एफडीसीचे मुख्य प्रवक्ता मयंक टिख्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही औषध लाँच झाल्यामुळे कोरोना रुग्णांची स्थितीत गंभीर होण्यापासून बचाव करता येऊ शकते.

 देशात बाधितांचा आकडा ३३ लाखांपार! 

भारतात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांचा आकडा ३३ लाखांवर पोहोचला असून गेल्या २४ तासात कोरोनाचे ७५ हजार ७६० नवे रूग्ण आढळले असून १ हजार २३ जणांचा जीव कोरोनामुळे गेल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. देशात २४ तासात ७५ हजार ७६० नव्या रूग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोना बाधितांचा आकडा हा ३३ लाख १० हजार २३५ वर पोहोचला आहे. तर ६० हजार ४७२ जणांचा जीवघेण्या कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या देशात ७ लाख २५ हजार ९९१ इतके अॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे २४ लाख ६० हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली असून त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


अमेरिकन कोरोना लसीच्या चाचणीनंतर Moderna कंपनीने दिली Good News!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -