जैश-ए-मोहम्मद पुलवामासारखा दुसरा हल्ला करण्याच्या तयारीत – गुप्तचर यंत्रणा

जैश-ए-मोहम्मद पुलवामासारखा दुसरा हल्ला करण्याच्या तयारीत – गुप्तचर यंत्रणा

जैश-ए-मोहम्मद पुलवामासारखा दुसरा हल्ला करण्याच्या तयारीत - गुप्तचर यंत्रणा

जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पुलवामासारखा दुसरा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. हा हल्ला काश्मीर घाटामध्ये होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. यासोबतच गुप्तचर यंत्रणेने माहिती दिली आहे की, जैश-ए-मोहम्मदचा एक कमांडर या हल्ल्यासाठी पाच ते सहा दहशतवाद्यांची ट्रेनिंग घेत आहे. त्यासोबतच तो या हल्ल्यासाठी काश्मीरच्या घाटी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या तरुणांना प्रभावित करुन या हल्ल्यात जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

पुन्हा आत्मघातकी हल्ला होण्याची शक्यता

याअगोदर गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली होती की, जैश-ए-मोहम्मदने पूलवामा सारखा आत्मघातकी हल्ला करण्याची तयारी केली आहे. हा हल्ला चौकीबाल आणि तंगधर मार्ग या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. या हल्ल्यासाठी हिरव्या रंगाची स्कॉरपिओ गाडीदेखील तयार करण्यात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.

‘५०० किलोच्या स्फोटकांच्या हल्ल्यासाठी तयार रहा’

सुरक्षा यंत्रनांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एक बंद गृपचा मॅसेज डिसक्लोज केला. या मॅसेजमध्ये लिहिण्यात आले होते की, ‘सुरक्षा यंत्रणांनी काश्मीरी लोकांना लक्ष्य करणे थांबवावे. लढाई आपली आणि फक्त आपल्यात आहे. गेला हल्ला २०० किलोच्या स्फोटकांचा होता. आता ५०० किलोच्या स्फोटकांच्या हल्ल्यासाठी सज्ज रहा.’ हा मॅसेज मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

First Published on: March 11, 2019 3:31 PM
Exit mobile version