जैश-ए-मोहम्मदचा पुन्हा मोठा हल्ल्याचा कट

जैश-ए-मोहम्मदचा पुन्हा मोठा हल्ल्याचा कट

जैश-ए-मोहम्मदचा पुन्हा मोठा हल्ल्याचा कट

पुलवामा येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद पुन्हा एकदा मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये लपून बसलेले दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचे पाकिस्तानात बसलेले प्रमुख यांच्यात फोनवर संभाषण झाले आहे आणि त्या संभाषणाच्या आधारावर गुप्तचर यंत्रणांनी मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. १४ फेब्रुवारीला जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याचादेखील इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. गुप्तचर यंत्रणांनी ७ आणि १४ तारीख सांगितली होती. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या या माहितीला गांभिऱ्याने घेणे फार महत्त्वाचे आहे.

जैश व्हिडिओमार्फत काश्मीरी तरुणांना भडकवणार

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद काश्मीरी तरुणांना भडकवण्याचा पुर्ण प्रयत्न करत आहे. यासाठी जैश पुलवामा हल्ल्याच्या तयारीचा व्हिडिओ जारी करणार आहे. या व्हिडिओमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा जबाबदार अली अहमद दार याच्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या २० वर्षीय अली अहमद दारने स्फोटकांनी भरलेल्या कारने सीआरपीएफच्या जवानांच्या बसला धडक दिली होती. त्यामुळे मोठा स्फोट झाला. याच अली अहमद दारचे उदाहरण घेऊन जैश काश्मीरी तरुणांना देशाविरोधात भडकवणार आहे.

हाय अलर्ट जारी

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने की, दहशतवाद्यांमधील हे संभाषण जाणुनबुजून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्यामुळे याकडे दुर्लक्ष देणे देखील योग्य नाही. त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे.

First Published on: February 21, 2019 10:23 AM
Exit mobile version