घरदेश-विदेशजैश-ए-मोहम्मदचा जवानांच्या बसवर हल्ला; ४४ जवान शहीद

जैश-ए-मोहम्मदचा जवानांच्या बसवर हल्ला; ४४ जवान शहीद

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बसला लक्ष्य केले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर जवानांवर गोळीबार करण्यात आला. पुलवामाच्या अवंतीपोरा येथे ही घटना घडली आहे. दुपारी साडेतीन वाजता दहशतवाद्यांनी हल्ला केला. आयईडीच्या स्फोटामध्ये सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले आहेत तर ३५ जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर परिसरामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. अडीच हजार जवानांचा ताफा जात असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. सीआरपीएफ जवानांची बस जात असताना त्या बसवर २०० किलो स्फोटकं भरलेली दहशतवाद्यांची कार धडकून स्फोट घडवण्यात आला. बसमध्ये असलेले जवान सुट्टीवरुन परत येत होते.

- Advertisement -

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगर-जम्मू हायवेवरील अवंतीपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या कॅम्पवर हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी हा हल्ला करण्यात आला आहे. अवंतीपोराच्या गरीपोरा येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी आधी आयईडीचा स्फोट केला त्यानंतर जवानांच्या वाहनांवर बेधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे अनेक जवान जखमी झाले. जखमी जवानांना श्रीनगर येथील लष्कराच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी जवानांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच ४४ जवान शहीद झाले. तर इतर ३५ जखमी जवानांपैकी अनेक जवानांची प्रकृतीं गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

अलर्ट जारी, सर्च ऑपरेशन सुरु

दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पुलवामा येथून जवानांची टीम, जम्मू -काश्मीरमधून पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांची टीम अवंतीपोराला रवाना करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर जवानांनी जम्मू-श्रीनगर हायवेवरील वाहतूक बंद केली आहे. अवंतीपोरा आणि आसपासच्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. त्याचसोबत पुलवामा, शोपियां, कुलगाम आणि श्रीनगर जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भ्याड हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यांनी स्विकारली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -