आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स कॉल’ करत असाल, तर सावधान!

आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स कॉल’ करत असाल, तर सावधान!

आंतरराष्ट्रीय 'कॉन्फरन्स कॉल' करत असाल, तर सावधान!

जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूने सर्वच देशात कहर केला आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या व्यक्तीला सुरक्षित राहण्याचा संदेश देत आहे. तर अनेक जणांची मुलं परदेशात असल्याने त्यांना सातत्याने फोनकॉलद्वारे काळजी घेण्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता जर तुम्ही तुमच्या परदेशी मुलांशी बोलण्यासाठी किंवा इतर काही कामामसाठी आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स कॉल’ करत असाल, तर सावधान! कारण महिन्याअखेर तुमच्या बिलाची रक्कम तुमची डोकेदुखी ठरू शकते. कारण जवळजवळ सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स कॉल’चे दर वाढवले असून, नागरिकांनी ही सेवा अधिक वापरल्यास त्यांना त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागू शकते, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) याबाबत ग्राहकांना एका पत्रकाद्वारे दिली आहे.

‘कॉन्फरन्स कॉल’ची संख्या वाढली

जगभरात असलेल्या कोरोनामुळे अनेक तरुण, विद्यार्थी, नोकरदार वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. तर भारतात वास्तव्यास असलेले त्यांचे पालक अनेकदा त्यांच्याशी कॉल्सद्वारे संवाद साधतात. मात्र, बऱ्याचदा नेटवर्क नसल्याने इंटरनेटऐवजी साध्या फोन कॉल्सचा वापर केला जातो. त्यातही एकापेक्षा अनेकांना बोलायचे झाल्यास ‘कॉन्फरन्स कॉल’ केला जातो. मात्र, लॉकडाऊनच्या काळात या ‘कॉन्फरन्स कॉल’ची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांकडून त्यांचे दर देखील वाढवण्यात आले आहेत.

याबाबत ट्रायकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीमध्ये ग्राहकांनी टेलिकॉम कंपन्यांनी अचानक बिलाची रक्कम वाढवण्याचा आरोप देखील केला आहे. तक्रारींचा तपास केला असता संबंधित सर्व ग्राहकांनी मोठ्य प्रामाणावर आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स कॉल केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या बिलाच्या रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. ही समस्या इतरांना भेडसावू नये, याकरता ट्रायकडून ग्राहकांना काही सूचना करण्यात आल्या आहेत.

दररोज हजारो कॉल्स

मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स कॉल करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात असलेली व्यक्ती एकाच कामासाठी युरोप आणि अमेरिकेतील सहकाऱ्यांशी संवाद साधते. तर दररोज मुंबई आणि पुण्यामधून हजारो कॉल्स केले जात आहेत. त्यामुळे या कॉन्फरन्स कॉलचा त्यांना चांगलाच फटका बसणार आहे.


हेही वाचा – ५ लाख मास्क, ९५० पीपीई किटची तस्करी; सर्व सामान चीनला पाठवण्याचा डाव


 

First Published on: May 14, 2020 9:44 AM
Exit mobile version