घरदेश-विदेश५ लाख मास्क, ९५० पीपीई किटची तस्करी; सर्व सामान चीनला पाठवण्याचा डाव

५ लाख मास्क, ९५० पीपीई किटची तस्करी; सर्व सामान चीनला पाठवण्याचा डाव

Subscribe

दिल्लीत कस्टमच्या पथकाने मोठ्या संख्येने मास्क, सॅनिटायझर्स आणि पीपीई किट जप्त केलं आहे. या वस्तू परदेशात कोण पाठवतंय याचा तपास केला जात आहे.

देशात सध्या कोरोना विषाणूचं संकट आहे, वाढत्या आकडेवारीचा विचार करता देशात वैद्यकीय वस्तूंची मोठ्या प्रमाणात गरज आहे. परंतु यादरम्यान बरेच लोक या गरजेचा फायदा घेत आहेत. राजधानी दिल्लीत कस्टमच्या पथकाने मोठ्या संख्येने मास्क, सॅनिटायझर्स आणि पीपीई किट जप्त केले. या वैद्यकिय साहित्याची तस्करी करुन परदेशात घेऊन जाण्याच्या तयारीत होते. मात्र, कस्टम टीमने त्यांचा डाव हाणून पाडला.

दिल्ली कस्टमच्या एअर कार्गोला याबद्दल इनपुट प्राप्त झाले, त्यानंतर शिपमेंटचा मागोवा घेण्यात आला. या जहाजातून सुमारे ५ लाख ८ हजार मास्क, ५७ लिटर सॅनिटायझर्स म्हणजे जवळजवळ ९५० बाटल्या आणि ९५० पीपीई किट जप्त करण्यात आल्या. कस्टमने नवी दिल्लीतील कुरियर टर्मिनलवर हे सर्व सामान जप्त केलं. हे सर्व सामान चीनला पाठवलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. या सामग्री व्यतिरिक्त, कस्टम टीमने २४८० किलो कच्चा माल जप्त केला, जो चीनला पाठवला जात होता. आता या प्रकरणाचा तपास केला जात असून या वस्तू परदेशात कोण पाठवतंय याचा तपास केला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अर्थमंत्री आज कृषीक्षेत्राला दिलासा देणार


देशावर कोरोना विषाणूचा साथीचा संकट आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने बर्‍याच वैद्यकीय वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. १९ मार्च रोजी सरकारने या वस्तूंची निर्यात थांबवली होती. त्यामध्ये सॅनिटायझर्स, मास्क देखील आहेत. त्याचवेळी या संकटामुळे भारतात एन-९५ मास्क आणि पीपीई किट बनवण्याचे काम सुरू आहे. या सर्व वस्तूंचा कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात खूप महत्वाचा वाटा आहे. अशा प्रकारे त्यांची छुप्यापद्धतीने निर्यात करणे हा मोठा गुन्हा आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -