पाकला झटका; कुलभूषण जाधव यांच्या खटल्याला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

पाकला झटका; कुलभूषण जाधव यांच्या खटल्याला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतराष्ट्रीय कोर्टात काल, सोमवारपासून सुनावणी सुरु झाली असून आज या सुनावणीचा दुसरा दिवस होता. काल दीपक मित्तल आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. तर आज पाकिस्तानच्या अॅटर्नी जनरलने आपल्या युक्तीवादाला सुरुवात केली. त्यावेळी सुरुवातीलाच कुलभूषणच्या बोगस पासपोर्ट आणि अन्य बाबींवर चढ्या आवाजात त्यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी आंतराष्ट्रीय कोर्टाच्या पॅनलचे अध्‍यक्ष अब्‍दुल कावी अहमद युसूफ यांनी पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल मन्सूर खान यांना हळू आवाजात युक्तिवाद करण्यास सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव खटला स्थगित करावा, अशी मागणी पाकिस्तानतर्फे करण्यात आली. मात्र ती मागणीदेखील कोर्टाने फेटाळली आहे. उद्या, बुधवारी पुन्हा दोन्ही देशांना त्यांची बाजू मांडण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे.

कुलभूषणच्या मुक्ततेची मागणी 

यावेळी पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल मन्सूर खान म्हणाले, ‘मी स्वत: भारतीय क्रूरतेचा शिकार आहे. मी तरुण लष्करी अधिकारी म्हणून भारतीय तुरुंगात कैद होतो. पाकिस्तानमधील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १४० मुलांचे जीव गेले. हा भारताचा पाठिंबा असणाऱ्या अफगाणिस्तानने केलेला दहशतवादी हल्ला होता. पाकिस्तानने आंतराष्ट्रीय कोर्टात नऊ मुद्दे ठेवले असून जाधव अनेक स्थानिक लोकांच्या संपर्कात होता आणि त्याने पाकिस्तानात दहशत पसरवण्यासाठी अनेक पाकिस्तानविरोधी शक्तींना सुसाइड बॉम्बर बनवण्यासाठी तयार केले होते. पूर्ण देश याला खतपाणी घालत आहे. विचित्र वागणुकीतून कुलभूषण मुक्त, दोषमुक्त करा, असा दावा भारताकडून केला जात आहे. मात्र, भारताकडे विश्वासाची कमरतात असल्याची टीका करत पाकिस्तानने युक्तिवाद केला आहे.

First Published on: February 19, 2019 8:06 PM
Exit mobile version