ब्रिटनचा कुख्यात ड्रग्स तस्कार किशन सिंहचे भारतात प्रत्यार्पण

ब्रिटनचा कुख्यात ड्रग्स तस्कार किशन सिंहचे भारतात प्रत्यार्पण

ब्रिटनचा कुख्यात ड्रग्स तस्कार किशन सिंहचे भारतात प्रत्यार्पण

घातक ड्रग्स पदार्थ्यांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीची म्होरक्या तसेच ब्रिटनमधील कुख्यात ड्रग्स तस्कर किशन सिंहला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहे. ड्रग्स तस्करीच्या आरोपीखाली ब्रिटनने आरोपी किशनला भारताकडे सुपूर्द केले आहे. आरोपीला भारताकडे प्रत्यार्पण करणे म्हणजे दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय सहकार्य असल्याचे दिसून आले. आत्तापर्यंत ब्रिटनने दोन आरोपींचे भारताकडे प्रत्यार्पण केले आहे. असे ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसने म्हटले आहे.

मुळचा राजस्थानचा रहिवासी असणाऱ्या ३८ वर्षीय आरोपी किशन सिंह याने ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले आहे. आरोपी किशन सिंहवर वर्ष २०१६ -१७ मध्ये मेफेड्रोन आणि केटमाइन सारखे घातक अंमली पदार्थ भारतात पाठवल्याचे आरोप आहेत. यानंतर मे २०१९ मध्ये आरोपी किशन सिंहला भारताकडे सुपूर्द करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिला होता. या आरोपाखाली किशन सिंहला ब्रिटन पोलिसांनी त्याला भारतीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. दरम्यान त्याला हिथ्रो विमानतळावरून भारतीय हवाई दलाच्या एका विमानातून रविवारी नवी दिल्ली येथे आणण्यात आले.

याआधी आरोपी किशन सिंहने तिहार तुरुंगातील प्रतिकूल परिस्थिती आणि मानवाधिकाऱ्याच्या मुद्दयावरून प्रत्यार्पणाला विरोध केला होता. अखेर रविवारी त्याला ब्रिटनने भारताकडे सुपूर्द केले. ब्रिटनने भारताला हवे असलेले आरोपी सुपूर्द करण्याची ही दुसरी घटना आहे. मागील वर्षी फेब्रुवारीत क्रिकेट सट्टेबाज संजीव चावलाला ब्रिटनने भारताकडे सुपूर्द केले. तर फरार आरोपी उद्योगपती विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाची मागणी ब्रिटनने भारताकडे केली आहे.


हेही वाचा- Today Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, जाणून घ्या आजचा दर


 

First Published on: March 23, 2021 2:37 PM
Exit mobile version