International Tiger Day 2020: भारतात पाचपटीने वाढू शकते वाघांची संख्या!

International Tiger Day 2020: भारतात पाचपटीने वाढू शकते वाघांची संख्या!

जगातील ७० टक्के वाघ असलेल्या भारतात त्यांची संख्या पाच पटीपर्यंत वाढवू शकते. पर्यावरण मंत्रालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार देशात २ हजार ९६७ वाघ असून संपूर्ण फक्त ३ हजार ९०० वाघ आहेत. तर वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, देशात अधिक संरक्षित निवासस्थान, सुरक्षित कॉरिडॉर आणि इतर संसाधने तयार करून १० ते १५ हजार वाघांचे रक्षण करण्यास सक्षम आहे.

त्यांच्यामते, आपण वाघांच्या दाट लोकवस्तीच्या क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित करू नये आणि इतर संभाव्य क्षेत्रांच्या विकासावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. अन्यथा, ५० पैकी केवळ १० ते १२ वाघांच्या समूहात मोठ्या संख्येने आढळणाऱ्या वाघांवर लक्ष केंद्रित होईल आणि उर्वरित वाघ दुर्लक्षीत होतील. तसेच सध्या देशभरातील व्याघ्र अधिवास कॉरिडोर्सना महामार्ग, रस्ते, वीज वाहिन्या आणि खाणकाम यासारख्या कार्यातून मोठा धोका आहे. म्हणूनच विकास आणि संवर्धनाचे संतुलन साधण्याच्या धोरणावर सरकारला अधिक लक्ष द्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

…तर भविष्यात वाघांची संख्या वाढेल

सरकारने सादर केलेल्या २०१८ च्या सर्वेक्षण अहवालात असेही म्हटले आहे की, बहुतेक वाघांचे निवासी कॉरिडोर संरक्षित क्षेत्र नाहीत. वाढत्या मानवी वापरामुळे आणि विकास प्रकल्पांमुळे हे कमी होतांना दिसत आहे.  ताज्या सर्वेक्षण अहवालात असे म्हटले आहे की. देशातील सुमारे ३.८१ लाख चौरस किलोमीटर क्षेत्र वाघांसाठी उपयुक्त आहे, तर सुमारे ९० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात वाघ आढळून येतात आहे. म्हणजेच वाघांचे अधिवास वाढविण्यास खूप वाव आहे, जे आपोआप भविष्यात त्यांची संख्या वाढवतील.

बर्‍याच देशांमध्ये वाघ विश्वासाचे प्रतीक

वाघ वाढविण्यासाठी सरकारने बांगलादेश, भूतान, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि कंबोडियासारख्या देशांशी भागीदारी करायला हवी. तसेच बांगलादेशाशी जवळून काम केल्याने रॉयल बंगाल वाघाला हवामानातील बदलामुळे सुंदरवन प्रदेशात फिरणाऱ्या धोक्यापासून वाचवता येऊ शकते. वाघ केवळ भारतातच नव्हे तर इतर बर्‍याच देशांमध्ये विश्वासाचे प्रतीक आहे. वाघ मलेशिया आणि बांगलादेशचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे. तर चीनी संस्कृतीत वाघ वर्ष देखील साजरे केले जाते.


International Tiger Day : जगभरातील ७० टक्के वाघ एकट्या भारतात!
First Published on: July 29, 2020 12:36 PM
Exit mobile version