घरदेश-विदेशInternational Tiger Day : जगभरातील ७० टक्के वाघ एकट्या भारतात!

International Tiger Day : जगभरातील ७० टक्के वाघ एकट्या भारतात!

Subscribe

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जगभरातील वाघांची साधारण ७० टक्के संख्या ही भारतामध्ये आहे. पर्यावरण मंत्रालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार देशात २ हजार ९६७ वाघ असून संपूर्ण फक्त ३ हजार ९०० वाघ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा भारत पर्यावरण संरक्षणासाठी नेहमीच अग्रेसर राहिला असल्याचे म्हटले आहे. जंगल आणि जंगली प्राण्यांना वाचवणे हे भारताचे संस्कार आहेत. आज जागतिक व्याघ्र दिनाला भारत अभिमानाने संपूर्ण जगाला हे सांगू शकतो की जगातील ७० टक्के वाघ हे एकट्या भारतात आहेत.

- Advertisement -

वाघांशी संबंधीत –

  • जगभरातील ७० टक्के वाघ एकट्या भारतात
  • जगात साधारण ४ हजार २०० वाघ आहेत
  • २०१८ ला टायगर सेन्ससच्या आकडेवारीनुसार भारतात २ हजार ९६७ वाघ होते
  • देशात सर्वाधिक वाघ ५२६ वाघ हे मध्य प्रदेश राज्यात आहेत
  • देशात १२ वर्षामध्ये वाघांची संख्या दुप्पट झाली आहे
  • भारतात ६ वर्षामध्ये ५६० वाघांचा मृत्यू झाला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -