CoronaVirus: ट्रम्प धमक्या देण्याऐवजी आम्हाला कोरोनाच्या संकटातून वाचवा – इराण

CoronaVirus: ट्रम्प धमक्या देण्याऐवजी आम्हाला कोरोनाच्या संकटातून वाचवा – इराण

CoronaVirus: ट्रम्प धमक्या देण्याऐवजी आम्हाला कोरोनाच्या संकटातून वाचवा - इराण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीला इराणने उत्तर दिलं आहे. इराणने म्हटलं की, संपूर्ण जग कोरोवा विषाणूशी झुंज देत आहे. आमच्या देशात या महामारीमुळे कठीण परिस्थितीत निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आम्हाला धमकावण्याऐवजी कोरोना विषाणूच्या संकटातून वाचवण्यासाठी मदत केली पाहिजे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून इराणला धमकावलं होत की, समुद्रात जर इराणी जहाजांनी अमेरिकन जहाजांना अडचण निर्माण केली तर त्यांना उडवून टाका.

कोरोनाग्रस्त अमेरिका या विषाणू विरोधात लढत आहे. मात्र याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्विटद्वारे चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर आरोप करत आहेत. कोरोना विषाणूचा सर्वात जास्त प्रादुर्भाव अमेरिका, स्पेन आणि इराणवर झाला आहे. परंतु यादरम्यान अमेरिका आणि इराण संबंध बिघडत असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन सैन्य प्रमुखांनी इराणवर भडकाऊ कारवाई केल्याचा आरोप केला आहे. परंतु इराणचे संरक्षणमंत्र्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचे ८ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४७ हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर इराणमधील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखाहून अधिक आहे. त्यापैकी २५ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – CoronaVirus: देशात चीनपेक्षा स्वस्त आणि चांगले ३ लाख रॅपिड टेस्टिंग किट्स तयार!


 

First Published on: April 23, 2020 10:09 AM
Exit mobile version