घरताज्या घडामोडीCoronaVirus: देशात चीनपेक्षा स्वस्त आणि चांगले ३ लाख रॅपिड टेस्टिंग किट्स तयार!

CoronaVirus: देशात चीनपेक्षा स्वस्त आणि चांगले ३ लाख रॅपिड टेस्टिंग किट्स तयार!

Subscribe

येत्या आठ दिवसात १० ते १२ लाख रॅपिड टेस्टिंग किट्स तयार होतील. तसंच महिन्या अखेर एक कोटी किट्स तयार होतील असं सांगण्यात येत आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताने चीनकडून मागवलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स सदोष निघाल्याचे उघडकीस आलं होत. मात्र आता भारतामध्ये रॅपिड टेस्टिंग किट्स तयार केलं जात असल्याचं समोर आलं आहे. चीनपेक्षा स्वस्त आणि उत्तम असलेले रॅपिड टेस्टिंग किट्स देशात तयार केलं जात आहेत. गुरुग्राममधील मानेसरमध्ये आतापर्यंत तीन लाख रॅपिड टेस्टिंग किट्स तयार करण्यात आले आहेत. येत्या आठ दिवसात १० ते १२ लाख रॅपिड टेस्टिंग किट्स तयार होतील, असं सांगितलं जात आहे.

हे किट मानेसर येथील सरकारी एचएलएल हेल्थकेअर आणि दक्षिण कोरियन कंपनी एसडी बायोसोन्सर तयार करीत आहेत. एसडी बायोसेन्सरने दोन लाख किट्स तयार केले आहेत. कंपनीच्या व्यवस्थापनाशी संबंधित असलेले अंशुल सारस्वत म्हणाले की, एक दिवसात एक लाख किट्स तयार करण्याची क्षमता आहे. बुधवारी २५ हजार किट्स हरयाणा सरकारने प्रदान केले आहेत.

- Advertisement -

बायोसेन्सरने तयार केलेले किट चीनच्या किटपेक्षा ४०० रुपयांनी स्वस्त आहे. सुमारे ३८० रुपये हे किट आहे. महिन्या अखेर एक कोटी किट्स तयार करण्याचं कंपनीच उद्दीष्ट आहे. येत्या आठ दिवसांत १० ते १२ लाख किट्स तयार होतील.

अलीकडेच आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की, मेपासून देशात दरमहा २० लाख टेस्टिंग किट्स तयार केले जातील. त्यापैकी एक लाख रॅपिड अँटी बॉडी आणि एक लाख आरटी पीसीआर किट्स असतील. आता दरमहा सहा हजार व्हेंटीलेटर तयार करण्याची क्षमता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: मुंबईसह या पाच शहरांमुळे केंद्र सरकारची वाढली चिंता!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -