२२ मे पासून धावणार विशेष ट्रेन; वेटिंग तिकीटही होणार बुक

२२ मे पासून धावणार विशेष ट्रेन; वेटिंग तिकीटही होणार बुक

२२ मे पासून धावणार विशेष ट्रेन; वेटिंग तिकीटही होणार बुक

लॉकडाऊन दरम्यान हाताशी काम नसल्यामुळे अनेक परप्रांतिय मजूर आपापल्या मुळगावाकडे परत निघाले आहेत. गेल्या ४५ दिवसांपासून अडकून पडलेल्या मजुरांचा संयम सुटला असून मिळेल त्या मार्गाने आता हे मजूर आपापल्या गावी परतू लागले. त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजूरांना आपापल्या गावात सोडण्यासाठी केंद्र सरकारने देखील परवानगी दिली आहे. त्यानुसार स्थलांतरीत मजूरांसाठी श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात आल्या आहे. नागरिकांसाठी १२ मे पासून विशेष राजधानी ट्रेन चालवण्यात येत आहेत. त्यामुळे, रेल्वे मंत्रालय मध्यम वर्गासाठी देशात मेल, एक्स्प्रेस विशेष ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहेत. यासाठी रेल्वे मंत्रालयाने बुधवारी अधिकृतपणे सर्क्युलरही जारी केले आहे.

या गाड्यांसाठी वेटिंग तिकीटही असणार आहे. पण, तात्काळ आणि प्रिमियम तात्काळ हे तिकीट मिळणार नाही. या गाड्या २२ मेपासून चावल्या जातील. या ट्रेनमधील प्रवासासाठी तिकीट बुकिंग १५ मेपासून सुरु होणार आहे. तसेच हे तिकीट आयआरसीटीच्या वेबसाईटवरुन बुकिंग केले जाईल.

नॉन एसी स्लिपरकरताही होणार बुकिंग

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन वेटिंग तिकीटची सुविधा दिली आहे. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये स्लिपर डब्बे देखील जोडले जाणार आहेत. तसेच या वेटिंग तिकीटचे बुकिंग देखील होणार आहे. AC 3 क्लासमध्ये १०० प्रवाशांचे वेटिंग तिकीट बुक होऊ शकते. तर एसी २ क्लासमध्ये ५० तिकीट बुक होऊ शकतात. तर एसी १ क्लासमध्ये २०-२० तिकीटांचे बुकिंग होऊ शकते. याशिवाय स्लिपर डब्ब्यात २०० वेटिंग तिकीट बुकिंग होऊ शकतात.

आरएसी तिकीट मिळणार नाही

या ट्रेनमध्ये आरएसी तिकीट मिळणार नाही. कारण आरएसी तिकीटावर प्रवास करणाऱ्या व्यक्तीला सीट मिळणे शक्य नसते. कारण एका सीटवरुन दोन जण प्रवास करणे कठिण होते. त्यामुळे या ट्रेनमध्ये आरएसी तिकीट मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे १५ मेपासून सुरु होणाऱ्या बुकिंगकरता आतापर्यंत २,०८,९६५ प्रवाशांनी तिकीट बुक केले आहे.


हेही वाचा – इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गाऊन न घालता केली सुनावणी


 

First Published on: May 14, 2020 11:18 AM
Exit mobile version