Cadbury Chocolates मध्ये केला जातो बीफचा (गोमांस) वापर? कॅडबरीने दिलं स्पष्टीकरण

Cadbury Chocolates मध्ये केला जातो बीफचा (गोमांस) वापर? कॅडबरीने दिलं स्पष्टीकरण

Cadbury Chocolates मध्ये केला जातो बीफचा (गोमांस) वापर? कॅडबरीने दिलं स्पष्टीकरण

सध्या सोशल मीडियावर एका प्रश्नाचे उत्तर नेटकऱ्यांतर्फे विचारण्यात येत आहे. कॅडबरी चॉकलेटमध्ये बीफचा (गोमांस) अंश असतो का? यामुळे सध्या भारतातील नेटकरी तसेच चॉकलेट लवर संतापले असून त्यांनी कॅडबरी कंपनीला ट्विट करत स्पष्टीकरण देण्यास सांगिततले आहे. अशातच लोकांचा वाढता आक्रोश पाहता कॅडबरीने आपले मत मांडले आहे. कॅडबरीने लोकांच्या प्रश्नाचे निरसन केलं आहे. त्यांचे प्रोडक्ट हे 100 टक्के शाकाहारी आहेत. तसेच लोकांनी खोटी माहिती पसरवण्यापुर्वी संपुर्ण खबरदारी बाळगायला हवी. असे वक्तव्य करत खोटी अफवा पसरवणाऱ्या लोकांवर टिका केली आहे. कॅडबरीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलद्वारे ट्विट करत लिहले आहे की, “ट्विटमध्ये जो स्क्रीन शॉट शेअर करण्यात आला आहे तो भारताता तयार होणाऱ्या Mondelez/cadburyप्रोडक्टचा आहे. भारतात तयार होणाऱ्या तसेच विक्री होणाऱ्या सर्व कॅडबरी प्रोडक्ट 100 टक्के शाकाहारी आहेत तसेच  पॅंकिंगवर देण्यात येणारा हिरवा डॉट याची खरी नोंद करत आहेत.”

काय आहे संपुर्ण घटना

सोशल मीडियावर सध्या एक स्क्रीनशॉट फोटो शेअर करत दावा करण्यात आला आहे. की, कॅडबरी त्यांच्या अनेक प्रॉडक्टमध्ये जिलेटिनचा वापर केला जातो. कंपनीने स्वत: यासंदर्भात संपुर्ण माहिती देत लिहले आहे की यामध्ये हलाला मीटचा वापर केला जातो. सखोल तपास केला असता व्हायरल होणारी पोस्ट ऑस्ट्रेलियमधील आहे आशी माहिती समोर आली आहे.कॅडबरी ऑस्ट्रेलियाने म्हंटलं होतं की, आमच्या प्रोडक्टमध्ये हलाला मीटचा वापर करण्यात येतो. यानंतर सोशल मीडियावरील हिंदू ग्राहकांनी कॅडबरी विरूद्ध संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल पोस्ट-


हे हि वाचा – Pegasus : एका व्यक्तीवर पाळत ठेवण्यासाठी येतो ७० लाख खर्च; स्पायवेअर ‘असं’ करतं काम

First Published on: July 19, 2021 7:21 PM
Exit mobile version