ईशा अंबानी जुळ्या मुलांसह अमेरिकेतून मुंबईत दाखल; देशभरातील मोठ्या मंदिराच्या पंडितांकडून खास पूजेची तयारी

ईशा अंबानी जुळ्या मुलांसह अमेरिकेतून मुंबईत दाखल; देशभरातील मोठ्या मंदिराच्या पंडितांकडून खास पूजेची तयारी

देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने 19 नोव्हेंबरला अमेरिकेतील लॉ एंजेलिसमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला, महिन्याभरानंतर ती शनिवारी आपल्या मुलांसह मुंबईत दाखल झाली आहे. तिच्या मुलांसाठी करुणा सिंधू यांच्या निवासस्थानी उद्या विशेष कार्यक्रम आणि पूजेचे आयोजन केले आहे.

विशेष म्हणजे ईशा आणि तिच्या दोन मुलांचे घरी स्वागत करण्यासाठी देशभरातील प्रसिद्ध मंदिरातील अनेक पंडित येणार आहेत. ईशाच्या घरी अंबानी कुटुंबियांनी एका जंग्गी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये अंबानी कुटुंब मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे आशीर्वाद मागणार आहेत.

यात तिरुपती बालाजी मंदिर, नाथद्वाराचे श्रीनाथजी मंदिर, श्री द्वारकाधीश मंदिरासह अनेक मंदिरांतून पूजेसाठी प्रसाद मागवण्यात आला आहे. यावेळी अंबानी कुटुंबीय 300 किलो सोने दान करणार आहेत. अन्नदानासाठी जगभरातून केटरर्सना बोलावण्यात आले आहे.

मीडियाच्या माहितीनुसार, मुंबईतील नामवंत डॉक्टरांचा एक ग्रुप लॉस एंजेलिसला गेला होता जो इशा आणि तिच्या दोन्ही मुलांसह मुंबईत परतला आहे. फ्लाईटमध्ये अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट बालरोगतज्ञ डॉ.गिब्सनही मुंबईत आले जेणेकरून मुलं सुखरूप पोहोचू शकली. ईशा आणि तिच्या मुलांना कतारच्या फ्लाइटने अमेरिकेतून मुंबईत आणले होते, जे मुकेश अंबानी यांच्या कतारमधील श्रीमंत मित्राने पाठवले होते.

करुणा सिंधू आणि अँटिलामध्ये ईशाच्या मुलांसाठीची नर्सरी पर्किन्स अँड विल यांनी डिझाईन केली आहे. ज्यात मुलांसाठी ऑटोमॅटिक बेड आणि ऑटोमॅटिक छत आहे, जेणेकरून मुलं उन्हात बसू उठू शकतात. सर्व नर्सरी फर्निचर विशेषतः लोरो पियाना, हर्मीज आणि डियोर यांनी डिझाइन केले आहे.

दोन्ही मुलांचे कपडे Dolce & Gabbana, Gucci आणि Loro Piana यांनी बनवले आहेत. इतकंच नाही तर BMW ने खास मुलांसाठी कार सीट्स डिझाइन केल्या आहेत. दोन्ही मुलांची काळजी घेण्यासाठी अमेरिकेतून स्पेशल ट्रेनिंगसाठी 8 आया आणि खास नर्सेज आणल्या आहेत. ज्या सतत मुलांसोबत राहणार आहे.


ये AU AU कौन है? विरोधकांचा खोचक प्रश्न; त्याला अजित पवारांचे चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

First Published on: December 24, 2022 4:37 PM
Exit mobile version