झाकीर नाईकच्या भाषणांवर मलेशियात बंदी

झाकीर नाईकच्या भाषणांवर मलेशियात बंदी

मुस्लिम धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक यांच्या धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या आणि चिथावणीखोर भाषणांवर मलेशिया सरकारने गंभीर दखल घेत बंदी घातली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते मलेशियात राहत आहेत. मलेशिया सरकारने झाकीर नाईक याच्या भाषणांवर सर्व राज्यात बंदी घातली असून याबाबत आदेश जारी केले आहेत. याबाबतचे ट्विट एएनआयने केले आहे. मलेशिया सरकारच्या या निर्णयामुळे झाकीर नाईक यांचा चांगलाच धक्का मिळाला आहे. सामाजिक सलोखा कायम राहावा आणि देशाच्या सुरक्षेच्या हिताच्या दृष्टीने ही कारवाई केली आहे, अशी माहिती मलेशियातील मीडियाने दिले आहे. झाकीर नाईक याच्या भाषणांवर बंदी घातल्याचा आदेश सर्व पोलीस स्थानकांना पाठवून देण्यात आला असल्याचे समजते.

मलेशियामधील हिंदूंना भारतातील मुस्लीम अल्पसंख्याकांपेक्षा १०० पट जास्त हक्क आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य नाईक यांनी केले होते. या त्याच्या वक्तव्याची मलेशिया सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मलेशिया दंड संहितेच्या कलम ५०४ अतंर्गत कोणत्याही समुदायाला कमी लेखल्यास कारवाईची तरतूद आहे. झाकीर नाईक याला भारताच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी मलेशियाचे मानव संसाधन विकासमंत्री एम. कुलसेगरन यांनी याआधीच केली आहे.

यापूर्वीच वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकचे प्रत्यार्पण न करण्याचा निर्णय हा कायद्याला अनुसरून झाल्याचे मलेशिया सरकारने स्पष्ट केले होते. झाकीर नाईकला भारताच्या हवाली करण्यास मलेशिया सरकार तयार असल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, झाकीर नाईकला भारताच्या हवाली करण्यास मलेशिया सरकारने नकार दिला होता. यावर आम्ही कायद्याचे पालन केले, असे स्पष्टीकरण मलेशियाचे मनुष्यबळ विकास मंत्री एम. कला. सेगरान यांनी दिले होते. झाकीर नाईकला भारताच्या हवाली करण्यात यावे यासाठी भारत सरकारने मलेशिया सरकारला विनंती केली होती. पण, मलेशिया सरकारने वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकला भारताच्या हवाली करण्यास नकार दिला होता.

First Published on: August 20, 2019 11:06 AM
Exit mobile version