Israel and Syria Crisis: इस्रायलने फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा सीरियावर केला एअर स्ट्राईक

Israel and Syria Crisis: इस्रायलने फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा सीरियावर केला एअर स्ट्राईक

Israel and Syria Crisis: इस्रायलने फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा सीरियावर केला एअर स्ट्राईक

इस्रायलने पुन्हा एकदा सीरियावर एअर स्ट्राईक केला आहे. बुधवारी रात्री इस्रायलकडून दमिश्क साउथवर हल्ला करण्यात आला. सीरिया स्टेट माध्यमांनुसार, बुधवारी रात्री केलेल्या या हल्ल्यात साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात इस्रायलकडून दुसऱ्यांदा सीरियावर एअर स्ट्राईक केला आहे.

९ फेब्रुवारी रोजी सीरियाकडून करण्यात आलेल्या अँटी-एअरक्राफ्ट मिसाईल अटॅकला इस्रायलने एअर स्ट्राईक करून उत्तर दिले आहे. माहितीनुसार, बुधवारी केलेल्या हल्ल्याचा निशाणा सीरियाचे लष्करीतळ होते. पण या हल्ल्यात कोणतीही जीवतहानी झाली नाही.

दोन्ही देशांमधील वादाचे कारण काय?

इस्रायल आणि सीरियामधील वाद खूप जुना आहे. यामागचे कारण गोलान हाइट्सचा भाग आहे. हा भाग गोलान डोंगर नावाने लोकप्रिय आहे. एकेकाळी या भागावर सीरियाचे वर्चस्व होते. १९६७ साली अरब देशांसोबत झालेल्या युद्धानंतर इस्रायलने हा भागावर आपला कब्जा केला. सध्या इस्रायल या भागावर जवळपास ३१७ मिलियन डॉलर म्हणजेच २३ अब्ज ७५ कोटी रुपयांहून अधिक जास्त खर्च करत आहे. या जागेमुळे दोन्ही देशांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

गोलान का महत्त्वाचा आहे?

सीरियाची राजधानी दमिश्क गोलानपासून ६० किलोमीटर दूर आहे. गोलानच्या उंच डोंगरावरून सहजपणे दमिश्क बघता येऊ शकतो. गोलानमध्ये पीकाचे उत्पादन देखील चांगले आहे, त्यामुळे इस्रायलचे गोलानवर अधिक लक्ष आहे.


हेही वाचा – इस्रायलने पृथ्वीच्या कक्षेबाहेर मिसाईल केले उद्ध्वस्त; Arrow वेपन सिस्टमची यशस्वी चाचणी पार


 

First Published on: February 17, 2022 3:17 PM
Exit mobile version