घरताज्या घडामोडीइस्रायलने पृथ्वीच्या कक्षेबाहेर मिसाईल केले उद्ध्वस्त; Arrow वेपन सिस्टमची यशस्वी चाचणी पार

इस्रायलने पृथ्वीच्या कक्षेबाहेर मिसाईल केले उद्ध्वस्त; Arrow वेपन सिस्टमची यशस्वी चाचणी पार

Subscribe

इस्रायलचे हे नवे हत्यार आता त्यांना दहशतवादी समूह, लेबनानचे हिजबुल्ला, फिलिस्तीनचे हमास आणि इराण जवळच्या देशांपासून रक्षण करेल.

इस्रायलने एक महत्त्वपूर्ण चाचणी यशस्वीरित्या पार केली आहे. यामुळे आता दहशतवाद्यांच्या मिसाईल हल्ल्यापासून इस्रायलचे संरक्षण होणार आहे. काल, मंगळवारी इस्रायलने पृथ्वीच्या कक्षेबाहेर लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाईलला उद्ध्वस्त केले. यासाठी त्यांनी एक नवीन हत्यार प्रणालीची चाचणी केली. या हत्यार प्रणालीचे नाव ऐरो वेपर सिस्टिम (Arrow Weapon System) असे आहे.

- Advertisement -

इस्रायलचे ऐरो वेपन सिस्टम हे एक असे हत्यार आहे, जे शत्रूकडून येणाऱ्या मिसाईलला हवेत नाही तर अंतराळ देखील नष्ट करू शकते. म्हणेजच बऱ्याच लांब पल्ल्यावरून मिसाईल अंतराळातून येत आहे, तर इस्रायलचे हे नवे हत्यार पृथ्वीच्या शंभर किलोमीटर वरती मिसाईलला नष्ट करू शकेल. इस्रायलचे हे नवे हत्यार आता त्यांना दहशतवादी समूह, लेबनानचे हिजबुल्ला, फिलिस्तीनचे हमास आणि इराण जवळच्या देशांपासून रक्षण करेल.

इस्रायलचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ऐरो वेपन सिस्टमचे ऐरो-३ इंटरसेप्टर्सने टार्गेटला ओळखून अंतराळात नष्ट करते. ऐरो वेपन सिस्टमची चाचणी पूर्ण यशस्वी झाली आहे.

- Advertisement -

इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गांट्स म्हणाले की, आम्ही कधीही पहिले पाऊल उचलत नाही, परंतु कोणताही शत्रू जर हल्ला करेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. हे नवीन तंत्रज्ञान आहे. आम्ही नेहमी तंत्रज्ञानाच्या पद्धतीने पुढे जात आहोत. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही आवश्यक पाऊल उचलतो. या सुरक्षा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता इस्रायल आपली रणनिती आखणीन मजूबत करू शकतो.

ऐरो वेपन सिस्टम इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीने अमेरिकन मिसाईल डिफेंस एजेंसीसोबत मिळून बनवली आहे. अमेरिकन मिसाईल डिफेंस एजेंसीचे वाइस एडमिरल जॉन हिल म्हणाले की, आम्ही या चाचणी दरम्यान या सिस्टममधील सर्व गोष्टींचा तपास केला आहे. ही सुरक्षा प्रणाली प्रत्येक गोष्टींमध्ये एक पाऊल पुढे आहे. आमचे इस्रायलसोबत जुने संबंध आहे, जे पुढच्या काळातही राहतील.


हेही वाचा – US Airport 5G : अमेरिकेत एअरपोर्टनजीक ५ रोलआऊटला ब्रेक ! एअर इंडियासह अनेक फ्लाईट्स रद्द


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -