नासाचा ‘विशेष’ अँटेना लँडरशी संपर्क साधण्याचा करतोय प्रयत्न

नासाचा ‘विशेष’ अँटेना लँडरशी संपर्क साधण्याचा करतोय प्रयत्न

भारतीयांसाठी काही दिवसांपूर्वी एक आनंदाची बातमी समोर आली. ती म्हणजे ऑर्बिटरला विक्रम लँडरची महिती मिळाली होती. तसंच ऑर्बिटरने लँडरचे फोटो काढले असल्याची माहिती देखील इस्त्रोचे प्रमुख के.सिवन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली होती. विक्रम लॅंडरने हार्ड लँडिंग केलं असलं तरी त्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती समोर आली होती. पण अजूनही इस्त्रोचा विक्रम लँडरशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे इस्त्रो ब्यालालु येथील ३२ मीटर अँटेनाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. इस्त्रो या अँटेनाचा वापर करून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

जेपीएलच्या ७० मीटर अँटेनाच्या सहाय्याने सुद्धा विक्रम लँडरशी संपर्क

इस्त्रोचे बंगळुरु जवळ असलेले डीप स्पेस नेटवर्क सेंटर हे ब्यालालु आहे. इस्त्रोने केलेल्या आतापर्यंतच्या सर्व प्रयत्नांना अपयश आलं आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न हा जेपीएलच्या ७० मीटर अँटेनाच्या सहाय्याने देखील करण्यात आला. नासाशी संबंधित असलेली जेपीएल ही प्रयोगशाळा आहे. पण अजूनही विक्रमकडून कुठलाही सिग्नल मिळालेला नाही. या जेपीएलचा विक्रमसोबत संपर्क साधण्यासाठी पुरेपूर वापर करत आहे. तसंच इस्त्रोचा जेपीएल बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे, असं इस्त्रोच्या एका वैज्ञानिकाने सांगितलं आहे.

…..नाहीतर विक्रमला सूर्यप्रकाश मिळणार नाही

इस्त्रोकडे फक्त २१ सप्टेंबरपर्यंत विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी वेळ आहे. कारण चंद्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे चौदा दिवस असतात. १४ दिवसांच्या दृष्टीने रोव्हर आणि लँडरची रचना केली गेली आहे. जर विक्रमसोबत २१ सप्टेंबरपर्यंत संपर्क झाला नाहीतर विक्रमला सूर्यप्रकाश मिळणार नाही.

भविष्यातील मोहिमांवर लक्ष केंद्रीत करा

जरी लँडरचे फोटो मिळाले असेल तरी इस्त्रोने अद्यापही लँडरच्या स्थितीची अधिकृत माहिती दिलेली नाही आहे. अजूनही लँडरवर बसवलेल्या अँटेना आणि ट्रान्सपाँडची स्थितीबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. अँटेना योग्य दिशेला असणे हे लँडरशी संपर्क करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी शास्त्रज्ञांना सल्ला दिला आहे की, भविष्यातील मोहिमांवर लक्ष केंद्रीत करा. आता यापुढे इस्त्रो कशाप्रकारे लँडरशी संपर्क साधणार आहे हे येत्या काळात कळेलं.

First Published on: September 11, 2019 10:43 PM
Exit mobile version