घरदेश-विदेशखुशखबर! सॉफ्ट लँडिंग न होऊनही 'विक्रम लँडर' सुखरुप

खुशखबर! सॉफ्ट लँडिंग न होऊनही ‘विक्रम लँडर’ सुखरुप

Subscribe

विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग झाले नसून हार्ड लँडिंग झाले आहे. तरी देखील विक्रम लॅंडरचे काहीही नुकसान झालेले नाही, अशी आनंदाची बातमी समोर आली आहे.

भारतीयांसाठी रविवारी एक आनंदाची बातमी म्हणजे ऑर्बिटरला विक्रम लँडरची माहिती मिळाली होती. तसंच ऑर्बिटरने लँडरचे फोटो काढले असल्याची माहिती देखील इस्त्रोचे प्रमुख के.सिवन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली होती. पण लँडरचे नुकसान झाले आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. मात्र इस्त्रोकडून आता लँडरबद्दल पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. विक्रम लॅंडरने हार्ड लँडिंग केलं असलं तरी त्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालले नाही आहे.

हेही वाचा विक्रम लँडरचा ठावठिकाणा कळला

- Advertisement -

चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटो आणि डेटा विश्लेषणावरुन अशी माहिती समोर आली आहे की, विक्रम लँडर हा फक्त एकाबाजूला झुकलेला आहे. तसंच संपूर्ण लँडर हे एकसंध आहे. त्याचे तुकडे झालेले नाही असं इस्त्रोच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

चांद्रयान २ मोहिमेच्या अंतिम टप्प्यामध्ये लँडर विक्रम चंद्रावर उतरण्यास अवघे २.१ मिनिटे बाकी असताना इस्त्रोच्या जमिनीवरून लँडरच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. लँडर जरी सुखरुप असल्याची माहिती मिळाली असली तरी लँडरशी अजूनही संपर्क झालेला नाही. इस्त्रोकडून पुढच्या १४ दिवसांमध्ये लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा ‘भारताची चांद्रयान २ मोहीम प्रेरणादायी’, नासानं केलं कौतुक!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -