श्रीहरिकोटा येथून सिंगापूरच्या दोन उपग्रहांसह PSLV-C55 चे केले यशस्वी प्रक्षेपण; पाहा व्हिडीओ

श्रीहरिकोटा येथून सिंगापूरच्या दोन उपग्रहांसह PSLV-C55 चे केले यशस्वी प्रक्षेपण; पाहा व्हिडीओ

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून PSLV-C55 सोबत सिंगापूरचे TeleOS-2 आणि LumiLite-4 हे दोन उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून PSLV-C55 सोबत सिंगापूरचे TeleOS-2 आणि LumiLite-4 हे दोन उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. इस्रोने सांगितले की, PSLV-C55 रॉकेट सिंगापूरच्या 2 उपग्रहांसह उद्दिष्ट कक्षेतून सोडण्यात आले आहे. हा उपग्रह पृथ्वी निरीक्षणासाठी सोडण्यात आला आहे. काही वेळातच हे उपग्रह ठराविक कक्षेत स्थिरावले. याबद्दल इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. हे मिशन केवळ परदेशी ग्राहकांसाठीच महत्त्वाचे नाही तर देशी स्पेस स्टार्टअपसाठीही महत्त्वाचे आहे. ( ISRO launched two satellites Singapore’s TeleOS-2 and LumiLite-4 along with PSLV-C55 from the Satish Dhawan Space Center in Sriharikota Andhra Pradesh )

PSLV- C55 स्वदेशी स्पेस स्टार्टअपसाठी महत्त्वाचं

इस्त्रोचे हे मिशन स्वदेशी स्टार्टअपसाठी महत्त्वाचे आहे. या मिशनमध्ये बंगळूर-आधारित स्पेस स्टार्टअप बेलाट्रिक्स एरोस्पेस आपले प्रायोगिक पेलोड, हाॅल-इफेक्ट थ्रस्टर अंतराळात पाठवेल. बेलाट्रिक्स पाठवत असलेले हे पेलोड दोन प्रकारे महत्त्वाचे आहेत. पहिले म्हणजे पेलोड लहान उपग्रहांसाठी सौर इलेक्ट्रिक प्रोपल्शन इंजिनचे प्रदर्शन करेल. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारंपारिक राॅकेटच्या तुलनेत HET अतिशय उच्च विशिष्ट आवेग प्रदान करते.

( हेही वाचा: सत्यपाल मलिक यांना ताब्यात घेण्यात आल्याची अफवा, पोलिसांनी दिली माहिती )

सिंगापूरसाठी हे मिशन महत्त्वाचे?

या मिशनमध्ये दोन सिंगापूरचे उपग्रह TeLEOS-2 आणि Lumelite-4 पाठवले जाणार आहेत. सिंगापूरसाठी हे दोन्ही उपग्रह महत्त्वाचे आहेत. TeLEOS-2 हा एक कृत्रिम छिद्र रडार उपग्रह आहे. हा उपग्रह सिंगापूर सरकार आणि ST अभियांत्रिकी यांचे प्रतिनिधित्व करणारी संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान एजन्सी यांच्यातील भागीदारी अंतर्गत विकसित करण्यात आला आहे.

Lumelite-4 इन्स्टिट्यूट फाॅर इन्फोकाॅम रिसर्च आणि नॅशनल युनिव्हर्सिटी आणि सिंगापूरच्या उपग्रह तंत्रज्ञान आणि संशोधन केंद्राने सह- विकसित केले आहे. TeLEOS-2 चा वापर दिवस रात्र कव्हरेज प्रदान करण्यासाठी केला जाईल आणि एक मीटर पूर्ण ध्रुवीय रेझोल्यूशनवर इमेजिंग करण्यास सक्षण आहे, Lumelite-4 हा एक प्रगत 12U उपग्रह आहे जो अंतराळ- जनित VHF डेटा एक्सचेंज सिस्टमच्या तांत्रिक प्रदर्शनासाठी विकसित केला आहे.

First Published on: April 22, 2023 5:57 PM
Exit mobile version