घरदेश-विदेशसत्यपाल मलिक यांना ताब्यात घेण्यात आल्याची अफवा, पोलिसांनी दिली माहिती

सत्यपाल मलिक यांना ताब्यात घेण्यात आल्याची अफवा, पोलिसांनी दिली माहिती

Subscribe

आरके पुरमच्या डीडीए पार्कमध्ये खाप पंचायत सुरू होती. मात्र, त्यासाठी पोलिसांकडून परवानगी देखील घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्याठिकाणी पोहोचून लोकांना बाहेर काढले. यानंतर सत्यपाल मलिक यांनी स्वत: पोलीस ठाणे गाठले.

दिल्लीच्या आरके पुरममध्ये आज शनिवारी (ता. 22 एप्रिल) गोंधळ उडाला. जेव्हा पोलिसांनी तेथे आयोजित खाप पंचायतीमध्ये अचानक दाखल होऊन खाप पंचायतीची बैठक रद्द करण्यास लावली. या खाप पंचायतीत जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकही उपस्थित होते. त्यामुळे काही वेळातच पोलिसांनी सत्यपाल मलिक यांना ताब्यात घेतल्याची अफवा पसरली. यानंतर त्यांचे समर्थक आरके पुरम पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. ज्यामुळे काही वेळातच प्रसार माध्यमांनी देखील पोलीस ठाण्यात गर्दी केल्याचे सांगण्यात आले.

यानंतर दक्षिण पश्चिम मनोज सी यांनी सत्यपाल मलिक यांना ताब्यात घेतले नसून ते स्वत: त्यांच्या समर्थकांसह पोलीस ठाणे गाठले असल्याचे निवेदन देऊन स्पष्ट केले.

- Advertisement -

परवानगीशिवाय सुरू होती खाप पंचायत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरके पुरमच्या डीडीए पार्कमध्ये खाप पंचायत सुरू होती. मात्र, त्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्याठिकाणी दाखल होऊन पंचायतीमधील लोकांना हटकले आणि पंचायतीची बैठक रद्द केली

ही खाप पंचायत रद्द करण्यात आल्यानंतर सत्यपाल मलिक त्यांच्या घरी गेले आणि नंतर मलिक यांनी त्यांच्या समर्थकांसह पोलीस ठाणे गाठले. पण आम्ही त्यांना ताब्यात घेतले नाही, कोणीही पोलीस ठाण्यात येऊ शकते. त्यांना हवे तेव्हा पोलीस स्टेशन सोडता येईल असे आम्ही त्यांना सांगितले आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी 36 तासांत करणार 3500 किमीचा प्रवास

दरम्यान, जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्याबाबत गौप्यस्फोट केला. ज्यामुळे देशातील वातावरण तापलेले आहे. त्यांच्या त्या गौप्यस्फोटानंतर काल शुक्रवारी (ता. 21 एप्रिल) सत्यपाल मलिक यांना कथित विमा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने समन्स बजावले आहेत. त्यांची 27 आणि 28 एप्रिलला सीबीआयसमोर हजर होण्यास सांगितले आहे. खुद्द मलिक यांनीच ही माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी आता ट्विटरवरून प्रतिक्रियाही दिली आहे. मी सत्य बोलून काही लोकांचे पाप उघड केले आहे. कदाचित म्हणूनच मला बोलावणे आले असेल. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी घाबरणार नाही. सत्याच्या बाजूने उभे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -