कोरोनापासून प्राणांच्या बचावासाठी लसीचे संशोधन सुरू…

कोरोनापासून प्राणांच्या बचावासाठी लसीचे संशोधन सुरू…

जगाबरोबर देशात फैलावात जाणाऱ्या कोरोना आळा घालण्यासाठी लसीवर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. केवळ भारतात नाही तर जगभरात शास्त्रज्ञ लसीचा शोध घेत आहेत. मात्र आता कोरोनापासून केवळ मानवाचा नाही तर प्राण्यांचाही बचाव करण्याची गरज आहे. त्यामुळेच आता प्राण्यांसाठीही लस बनवण्याचा विचार आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी त्या दिशेनं तयारी सुरू केली आहे. बरेलीतील इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्युट (IVRI) प्राण्यांसाठी कोरोना लस, टेस्ट किट बनवणार आहे.

यूएसमध्ये एक वाघ आणि हाँगकाँगमध्ये कुत्रे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे भविष्यात प्राण्यांमध्ये हा व्हायरस पसरण्याचा धोका लक्षात घेत आतापासूनच प्राण्यांनाही कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लस तयार केली जाते आहे.  मात्र भारतात आतापर्यंत कोणत्याही प्राण्याला कोरोनाव्हायरसची लागण झालेली नाही.

या लसी विषयी बोलताना IVRI चे संचालक आर.के. सिंग म्हणाले की,  “इंडियन काऊन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च (ICAR) चे डायरेक्टर जनरल यांच्या निर्देशानुसार, आम्ही पाळीव आणि जंगली प्राण्यांसाठी कोरोना लस विकसित करण्याचा विचार करत आहोत. तसंच लॅब आणि फिल्डवर वापरता येईल अशी डानोस्टिक टेस्ट तयार करण्याचाही आमचा विचार आहे. प्राण्यांमधील कोरोनाव्हायरसचं संक्रमण आणि त्यांच्यामध्ये त्याचा प्रसार होण्यापासून रोखणं यादिशेनंही आम्ही अभ्यास करत आहोत ”


हे ही वाचा – हे बूट वापरा आणि कोरोनाला घाला आळा…सोशल डिस्टन्सिंगसाठी उत्तम पर्याय!


 

First Published on: June 2, 2020 11:02 PM
Exit mobile version