जगन्नाथ रथ यात्रेचं मुस्लीम, शीख धर्मियांकडून जल्लोषात स्वागत

जगन्नाथ रथ यात्रेचं मुस्लीम, शीख धर्मियांकडून जल्लोषात स्वागत

उत्तर भारतातील सर्वात प्राचीन मंदिर श्री जगन्नाथ भगवान यांच्या रथ यात्रेच रविवारी आयोजन करण्यात आलं होतं. या रथ यात्रेत भगवान जगन्नाथ यांची मंदिरापासून चौगान मैदानापर्यंत पालकीतून आणले जाते. त्यानंतर श्री जगन्नाथ भगवान यांना रथावर बसवले जाते. त्यानंतर संपूर्ण शहराची परिक्रमा केली जाते. या यात्रेच्या दरम्यान नाहनमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख आणि ईसाई यांसारख्या प्रत्येक धर्माचे लोक पालकीचे भव्य स्वागत करतात.

श्री जगन्नाथ भगवान यांच्या पालकीचे श्री दशमेश गुरूद्वारा नाहन जवळील सिख समाजातील लोकांनी या रथयात्रेच स्वागत केलं. त्यानंतर पुढे गेल्यावर यात्रा चौहान मैदान येथे पोहोचल्यावर उत्तर भारतातील विभिन्न भागातून आलेल्या लोकांनी रथाला खेचले. या रथयात्रे दरम्यान भाविकांनी श्री जगन्नाथ भगवान यांच्या नावाचा जयघोष करत संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. या यात्रेत सिरमौर सहित, हरियाणा , पंजाब आणि उत्तराखंड मधून देखील अनेक भक्त सहभागी होतात.

१४ वर्षांपासून होतय भव्य आयोजन


गेल्या अनेक वर्षांपासून नाहन येथून श्री जगन्नाथ भगवान यांची यात्रा निघते. रथयात्रा भाविकांच्या जय जय कारात रममान होते. नाहन येथे श्री दशमेश अस्थान गुरूद्वारामध्ये शीख समाजातील लोकांच्या वतीने या यात्रेच स्वागत केले जाते. २००९ पासून या यात्रेचं नाहन येथे भव्य आयोजन केले जाते.

जगन्नाथ रथ यात्रा साजरी करण्यामागे हे आहे कारण
भगवान जगन्नाथांच्या रथ यात्रेला भारतात साजरा केल्या जाणाऱ्या धार्मिक महामहोत्सवातील सगळ्यात प्रमुख मानले जाते. ही यात्रा भारतात अनेक वर्षांपासून साजरी केली जाते. या रथाबाबत अशी मान्यता आहे की, एके दिवशी सुभद्रा देवी आपले भाऊ कृष्ण आणि बलराम यांच्याकडे संपूर्ण नगर पाहण्याची इच्छा दर्शवतात. तेव्हा आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्ण आणि बलराम एक भव्य रथ तयार करतात आणि त्यात बसून ते तिघे नगर फिरतात. यामुळेच प्रत्येक वर्षी जगन्नाथ यात्रा साजरी केली जाते.

 


हेही वाचा :आजपासून जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात, लाखो भक्तांची उपस्थिती

First Published on: July 4, 2022 10:17 AM
Exit mobile version