Hanuman Jayanti Violence : हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभा यात्रेवर दगडफेक, नक्की काय घडल?

Hanuman Jayanti Violence : हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभा यात्रेवर दगडफेक, नक्की काय घडल?

Hanuman Jayanti Violence : हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभा यात्रेवर दगडफेक, नक्की काय घडल?

दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभा यात्रेवर दगडफेक करण्यात आली आहे. शोभा यात्रादरम्यान दोन गट आमने-सामने आले आणि दंगलसारखी परिस्थिती निर्माण झाली. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ५ ते ६ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर ७ लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आले आहे. हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती. तसेच घोषणाबाजी सुरु होती. यावेळी दुसऱ्या गटाने शोभा यात्रेवर दगडफेक केली.

हनुमान जयंती देशभरात साजरी करण्यात आली आहे. यामध्ये काही राज्यात हनुमान जयंतीच्या शोभा यात्रेवर दगडफेक करण्यात आली असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दिल्लीत शोभा यात्रेदरम्यान दंगल झाली आहे. दंगलखोर जमावाने शोभा यात्रेवर दगडफेक केली. या वेळी गोळीबार झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच ६ राऊंड फायर झाले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. जहांगीरपुरीच्या ज्या भागात दंगल झाली त्या ठिकाणी सकाळपासून शोभा यात्रा शांततेत सुरु होती परंतु दुपारनंतर दोन गट आमनेसामने आले.

दुपारी ४ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत काय घडलं?

हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा ५.४० वाजता काढण्यात आल्यानंतर दंगलीला सुरुवात झाली. यावेळी इफ्तारपूर्वी लोकं नमाद अदा करण्यासाठी जात होते. मशिदीच्या समोरच हाणामारी सुरु झाली होती. शोभायात्रा मशिदीजवळ आल्यानंतर लोकांनी मोठ्या आवाजात घोषणाबीजी केली. तसेच मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आले होते. मशिदीमध्ये भगवा ध्वज नेण्याचाही प्रयत्न झाला असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान शोभा यात्रा काढणाऱ्यांनी हे आरोप फेटाळले असून शोभायात्रेला लक्ष्य करण्यासाठी कट रचण्यात आला होता असे सांगितले.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा यात्रेदरम्यान मोठ्या आवाजात संगीत लावण्यात आले होते. संगीतामुळे शोभा यात्रा अडवण्यात आली आणि संभाषणादरम्यान वाद पेटला. सकाळपासून शोभा यात्रा शांततापूर्ण सुरु होती मग दुपारनंतर शोभायात्रा का थांबवण्यात येईल? असा एका गटाने प्रश्न उपस्थित केला आहे.

पोलिसांकडून तपासासाठी ड्रोनचा वापर

जहांगीरपुरीमध्ये शोभा यात्रेत झालेल्या दंगलीमध्ये गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यावर पोलिसांनी मौन बाळगले आहे. एक पोलीस अधिकारी गोळी लागल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. ६ राऊंड फायर झाले असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. मात्र पोलिसांना संशय आहे की, दंगलखोरांनी दगडफेक करण्यासाठी घरांच्या कौलांवर दगड गोळा केले होते. याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला आहे.

जगांगीरपुरीमध्ये ८ वाजता परिस्थिती आटोक्यात

हनुमान जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रा दुपारी ४ वाजता सुरु झाली होती. या मिरवणुकीला के ब्लॉकच्या दिशेना जायचे होते. परंतु सी ब्लॉकजवळ मिरवणूक पोहोचल्यावर किरकोळ भांडण सुरु झाले. परंतु काही वेळात दंगलसारखी परिस्थिती निर्माण झाली. ६.२० वाजता पोलिसांच्या कंट्रोल रुमला माहिती मिळाली होती. माहिती मिळताच दिल्ल पोलीस सब इंस्पेक्टर मेधालाल घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या एका कर्मचाऱ्याला गोळी लागली असून ६ कर्मचारी जखमी झाले. यानंतर सर्व वरिष्ट अधिकारी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. दंगलीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये संध्याकाळी ८ वाजेपर्यंत यश मिळाले.


हेही वाचा : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत स्फोटामुळे कंपनीला भीषण आग, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

First Published on: April 17, 2022 9:18 AM
Exit mobile version