जम्मू-काश्मीरमधील सोपोरमधील मॉडेल टाऊन भागात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) गस्तीवर असलेल्या पक्षावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे चार जवान जखमी आणि एका नागरिकाच्या मृत्यू झाला आहे. असे सांगितले जात आहे की जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा तो माणूस आपल्या कारमधून जात होता. दरम्यान सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. दोन ते तीन अतिरेकी या भागात लपल्याची माहिती आहे. हा परिसर घेरला गेला असून या भागाची तपासणी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Terrorists attacked a naka party at Model town in Sopore. Injuries to some Central Reserve Police Force (CRPF) jawans and a civilian reported. Area cordoned off and search operation started: Dilbag Singh, DGP Jammu & Kashmir Police (file pic) https://t.co/uAVm7DG5Bu pic.twitter.com/ZhwoZ5tLUy
— ANI (@ANI) July 1, 2020
यापूर्वी दक्षिण काश्मीरच्या बिजबेहरामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात कुलगामच्या यारीपोरा येथील एका माणसालाही आपला जीव गमवावा लागला आहे.
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या आणि अतिरेक्यांच्या दरम्यान आज झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने मंगळवारी सकाळी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील वाघामा येथे कारवाई सुरू केली आहे.
याच दरम्यान अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले, त्यानंतर चकमक सुरू झाली. या अधिकाऱ्याने सांगितले की आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तर दहशतवाद्यांची ओळख पटली नसून ते कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत याचा शोध घेतला जात आहे. तसेच अनंतनागमधील खुलचोहर भागात सोमवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादीही ठार झाले होते.