Jammu Kashmir: वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद

Jammu Kashmir: वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद

Jammu Kashmir: वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद

जम्मू काश्मीरमध्ये ( Jammu and Kashmir) या आठवड्यात दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरुच आहे. जम्मू काश्मीरमधील अनेक ठिकाणे दहशतवाद्यांनी टार्गेट केली आहेत. भारतीय सैन्य दहशतवाद्यांच्या खात्मा करत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सध्या धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्याने जम्मू काश्मीरच्या अनेक भागातील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. श्रीनगर,ईदगाह,कमरवारी, शौरा,एमआर गुंग, नौहट्टा,अंचार या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे त्याचप्रमाणे वानपोह,किमोह आणि उत्तर पुलवामा या भागातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. घाटी क्षेत्रातील एकूण ११ ठिकाणच्या इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

काश्मीरमध्ये या माहिन्यात अनेक सर्वसामन्य नारिकांची हत्या करण्यात आली आहे. कुलगाम वानपोहच्या अनेक भागात भरदिवसा तीन कामगारांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला ज्यात २ जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंबीररित्या जखमी झाला. त्याचप्रमाणे शनिवारी देखील पुलवामा आणि श्रीनगरमध्ये उत्तर प्रदेश बिहारमधून आलेल्या कामगारांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यात दोन कामगरांचा मृत्यू झाला होता.

काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे नागरिक घाबरले असून त्यांच्यात भितीचे वातावरण आहे. लोक काश्मीरसोडून जात आहेत. जम्मू रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने लोक रेल्वेची वाट पाहताना दिसत आहेत. काश्मीर घाटी परिसरात आम्हाला पुन्हा यायचे नाही अशी प्रतिक्रिया तिथले नागरिक देत आहेत.


हेही वाचा – काश्मीरमध्ये कलम ३७० हटवूनही परिस्थितीत सुधारणा नाही; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

First Published on: October 18, 2021 6:53 PM
Exit mobile version