घरदेश-विदेशकाश्मीरमध्ये कलम ३७० हटवूनही परिस्थितीत सुधारणा नाही; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काश्मीरमध्ये कलम ३७० हटवूनही परिस्थितीत सुधारणा नाही; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Subscribe

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० हटवूनही परिस्थितीत बदल झालेला नाही. जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही परिस्थिती हाताबाहेर आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्वलंत सत्य समोर मांडलं, असं राऊत म्हणाले. तसंच, मोदी सरकारने ठोस भूमिका घ्यायला हवी. काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काश्मीरच्या परिस्थितीवरुन भाजपवर खरमरीत टीका केली. काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली की नाही, हे आता सांगता येणार नाही. परिस्थिती संदर्भात तिथल्या बातम्या बाहेर येऊ दिल्या नाहीत. तिथे इंटरनेट बंद होतं. तिथल्या माध्यमांवर बंदी होती. तिथल्या लोकांच्या हालचालींवर बंधणं होती. तिथले नेते कैदेमध्ये होते. त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

कलम ३७० हटवल्यानंतर तिथली परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकार काय करत होतं? आणि सरकार आज काय करत आहे? हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी देशासमोर येऊन काश्मीरची परिस्थिती नेमकी काय आहे हे स्पष्ट केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

मग चीनवर सर्जीकल स्ट्राईक करा

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा निर्माण झाला आहे. त्याला तणाव म्हणत नाहीत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल ज्वलंत सत्य समोर मांडलं. कलम ३७० हटवून सुद्धा जम्मू काश्मीरच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकलेली नाही. आजही तिकडे अतिरेक्यांचा तांडव, हैदोस सुरु आहे. हे जर रोखलं जात नसेल तर याची जबाबदारी ही केंद्राची आहे, गृहमंत्रालयाची आहे. पाकिस्तानच्या बाबतीत नुसत्या धमक्यांची भाषा वापरुन हे थांबलं जाणार नाही. सर्जिकल स्ट्राईक करु. मग चीनवर पण करा. चीन लडाखमध्ये घुसलं आहे. तवांगमध्ये घुसलं आहे. मग चीनवर सर्जीकल स्ट्राईक करु म्हणून सांगा, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -