जम्मू कश्मीर : भारतीय जवानांनी केला पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू कश्मीर : भारतीय जवानांनी केला पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू कश्मीरवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला आहे. केंद्रशासित प्रदेशातील कुपवाडा सेक्टरमधील तंगधार भागात सुरक्षा दलांनी बॉडरवरुन घुसखरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्याला ठार केले. यासह हा दहशतवादी पाकिस्तानचा नागरिक होता. (Jammu and Kashmir news infiltration bid foiled in kupwara near loc one terrorist killed )

भारतीय नियंत्रण रेषेजवळ अनेक पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी यानंतर रणनिती आखून ऑपरेशन करण्यास सुरूवात केली आणि आतापर्यंत भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले. सध्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येतेय.

माहितीनुसार 19 ऑक्टोबर रोजी कुपवाडा जिल्ह्यातच भारतीय सुरक्षा रक्षकांना आयडी मिळाला होता. यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने जिल्ह्यातील हंदवाडा भागातील उडीपुरा येथे रस्त्याच्या कडेला दहशवाद्यांनी लावलेले अनेक आयडी जप्त करण्यात आले यानंतर कोणालाही यामुळे नुकसान पोहचू नये या कारणात्सव हे आयडी निष्क्रिय करण्यात आले.

________________________________________

हेही वाचा – भारतीय संघाला मिळाले निकृष्ट दर्जाचे जेवण, सरावालाही दिला नकार

First Published on: October 26, 2022 11:11 AM
Exit mobile version