हंदवाडामध्ये CRPF च्या जवानांवर हल्ला; ३ जवान शहीद तर १ दहशतवादी ठार

हंदवाडामध्ये CRPF च्या जवानांवर हल्ला; ३ जवान शहीद तर १ दहशतवादी ठार

हंदवाडामध्ये CRPF च्या जवानांवर हल्ला, तीन जवान शहीद तर १ ठार

उत्तर काश्मीरच्या हंदवाडा येथे सोमवारी संध्याकाळी काही दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या गस्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात बंदोबस्तासाठी तैनात असलेले तीन जवान शहीद तर सात जखमी झाले आहेत. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याचेही वृत्त समोर येत आहे. हंदवाडाच्या वानिगाम या भागात सुरक्षा दलाने घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या 92 बटालियनचे बंदोबस्तासाठी तैनात असलेले काही जवान सायंकाळी हंदवाडा या भागातून जात असताना वनिगाम भागात लपलेल्या काही अतिरेक्यांनी जवानांवर हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत तीन सैनिक शहीद झाल्याची माहिती मिळाली असून या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.

दरम्यान हल्लेखोरांनी तेथून पळ काढला असून माहिती मिळताच सैन्य, एसओजी आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. या ठिकाणी पोहोचून जवानांनी वानिगाव भागाला वेढा देखील घातला आहे. तसेच या भागातील सर्व रस्ते सील करण्यात आले असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोध मोहीम राबविली जात आहे. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी कोणत्याही घरात लपू शकतात, त्यामुळे आता प्रत्येक घरा-घरात शोध घेण्यात येत आहे. गेल्या रविवारीच हंदवाडाच्या छंजमुला भागात झालेल्या चकमकीत सैन्याचे कर्नल, मेजर, दोन जवान आणि पोलिसांचे एसआय शहीद झाले होते मात्र या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना देखील ठार केले होते.


‘करारा जवाब मिलेगा’, लष्करप्रमुख नरवणेंचा पाकिस्तानला इशारा
First Published on: May 4, 2020 7:28 PM
Exit mobile version