जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; पंपोर LeTचे ३ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; पंपोर LeTचे ३ दहशतवादी ठार

Jammu Kashmir च्या बारामुल्लामधील चकमकीत ३ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा; १ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे एन्काउंटर सुरुच आहे. पुलावामामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आता सुरक्षा दलाचे पंपोरममध्ये मोहिम सुरू आहे. पंपोरमधील चकमकीमध्ये LeTच्या तीन दहशतावद्यांना ठार मारले आहे. या ठार झालेल्या यादीत एलइटीचे टॉप कमांडर उमर मुश्ताक आणि शाहित खुर्शीद यांचा समावेश आहे. सुरक्षा दलाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत पाच पैकी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. पंपोरमध्ये ज्या दहशतवाद्यांना ठार केले गेले आहे, ते सर्व ‘सिविलियन किलिंग’मध्ये सामिल होते. उमर मुश्ताकने दोन पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केली होती. तर शाहिद खुर्शीदने सामान्य नागरिकांना निशाणा बनवले होते. आता सुरक्षा दलाने बदला घेत या दोघांचा खात्मा केला आहे.

तपासा दरम्यान असे समोर आले की, सामान्य नागरिकांची हत्या केल्यानंतर शाहिद खुर्शीद आणि शाहिर बशीर पुलवामात पळून गेले होते. तर उमर मुख्तार शोपियांकडे वळला होता. परंतु सुरक्षा दलाने सर्व भागांमध्ये मोहीम वेगवान केली असून एक-एक दहशतवाद्याला ठार करत आहेत. या मोहिमेबाबत डीआयजीचे विवेक गुप्ता म्हणाले की, ‘हे करण्यासाठी खूप वेळ लागतो. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही या दहशतवाद्यांना पकडत आहोत. अशा काही घटना आहेत जिथे आम्ही त्या दहशतवाद्यांच्या संपर्कात येऊ शकतो. पण अनेक ठिकाणी या दहशतवाद्यांना जंगलात लपण्याची संधी मिळते. या दहशतवाद्यांना स्थानिकांचा सपोर्ट मिळत नाही आहे. परंतु काही लोकं गरजेच्या वस्तू पाठवत आहेत. आमची सर्वांवर नजर आहे.’

तर आयजीपी काश्मीरने माहिती दिली आहे की, ‘खोऱ्यात झालेल्या सिविलियन किलिंगनंतर एकूण ९ एन्काउंटवर केले आहेत. या चकमकीत सुरक्षा दलाने १३ दहशतवाद्यांना ठार केले आहे. यामधील तीन दहशतवाद्यांना फक्त २४ तासांचा आत ठार केले आहे.’


हेही वाचा – सिंघू बॉर्डर खाली करा, तरुणाच्या निर्घृण हत्येनंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल


 

First Published on: October 16, 2021 6:22 PM
Exit mobile version