घरदेश-विदेशसिंघू बॉर्डर खाली करा, तरुणाच्या निर्घृण हत्येनंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

सिंघू बॉर्डर खाली करा, तरुणाच्या निर्घृण हत्येनंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Subscribe

सिंघू बॉर्डवर तरुणाच्या हत्येनंतर दिल्ली आणि हरयाणा सीमेवर तणावाचे वातवरण निर्माण झाले आहे, संयुक्त किसान मोर्चातील नेत्यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. या हत्येची जबाबदारी निहंग्या शीखांच्या एका समुहाने घेतली आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये सिंघू बॉर्डर खाली करण्याची मागणी करण्यात आली आहे.

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या ९ महिन्यापासून सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र शुक्रवारी पहाटे सिंघू सीमेवर लखबीर सिंग या तरुणाचा छिन्न-विछिन्न अवस्थेतेतील मृतदेह आढळून आला होता. या तरुणाचे हात आणि पाय कापलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्येप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक केली आहे.

- Advertisement -

लखबीरच्या हत्येप्रकरणी आता शशांक शेखर झा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी सांयकाळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणी तातडीने सुनावणीची मागणी केली आहे. या याचिकेत त्यांनी सिंघू बॉर्डर लवकरात लवकर रिकामी करण्यात यावी, मागणी केली आहे.

शेतकऱ्यांचे आंदोनल सुरु असलेल्या व्यासपीठाजवळील एक बॉरिकेट्सवर तरुणाचा मृतदेह लटकवलेल्या अवस्थेत आढळला होता. दरम्यान शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हिंसाचाराचा घटना समोर आल्या आहेत. यामुळे शेतकरी आंदोलनावरून सुप्रीम कोर्टाने यापूर्वी चांगलेच फटकारले होते. शेतकऱ्यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, रेल्वे, महामार्ग सर्व तुम्ही बंद करत आहात. शहरातील लोकांनी त्यांचे व्यवसाय बंद करावेत का? या भागातील लोक तुमच्या आंदोलनामुळे आनंदी आहेत का? तुम्ही शहरात आंदोलन करण्याची परवानगी मागताय. तुम्ही आता शहराचा गळा घोटणार आहात का? असे सवाल उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते.

- Advertisement -

सिंघू बॉर्डरवर तरुणाच्या हत्येप्रकरणी आता एक निहंग्या तरुण पोलिसांसमोर शरण आला आहे. सरवजीत सिंह असं त्याचं नाव असून आपणच हत्या केली असल्याचा दावा त्याने केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्य़ाआधी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल. घटनेची जबाबदारी निहंग्यांचा गट असलेल्या निर्वेर खालसा उडना दलाने घेतली आहे. त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या हत्येचा दावा केला आहे. लखबीरने त्यांच्या धार्मिक ग्रंथाचा अवमान केल्यानं हत्या केली असंही त्यात म्हटलं आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -