काहीच न करता ‘ही’ व्यक्ती महिन्याला कमावते लाखो रुपये; कसे ते वाचा

काहीच न करता ‘ही’ व्यक्ती  महिन्याला कमावते लाखो रुपये; कसे ते वाचा

आपण नेहमीच मोठ्यांकडून ऐकतो किंवा पुस्तकांमध्ये वाचतो की पैसे कमवण्यासाठी माणसाला खूप मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय पैसा नाही. पण तुम्ही काहीही न करता लाखो रुपये कमवू शकता असं जर कोणी म्हटले तर तुमचा विश्वास बसले का? नाही ना… पण हे खरं आहे. जपानमध्ये असा एक व्यक्ती आहे जो कोणतेही का न करता महिन्याला लाखो रुपये कमावतो. ज्यामुळे तो नेमकं काय काम करतो याची जगभर चर्चा होतेय. हे अनोखे काम करणाऱ्या या व्यक्तीचे नाव शोजी मोरिमोटो आहे. लोक त्याला ‘डू-नथिंग’ मॅन म्हणूनही ओळखतात.

नेमकं काम काय करतो?

39 वर्षीय शोजी मोरिमोटो एकाकी लोकांना काही तासांचा सहवास (कंपनी) देण्यासाठी जातो. याच कंपनीसाठी त्याला पैसे दिले जातात. पार्टी, लंच किंवा कोणत्याही इव्हेंटला तो एकाकी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कंपनी देतो. यावेळेत तो फक्त त्या व्यक्तीसोबतच असतो. यावेळी तो खाऊ-पिऊ शकतो, तसेच रिअॅक्शन देऊ शकतो, पण समोरच्या व्यक्तीने त्याला काही विचारल्यावरच तो बोलतो. दररोज किमान 3-4 अशा क्लायंटला हा व्यक्ती हँडल करतो. तो एका क्लायंटकडून एका सेशनसाठी 6-7 हजार रुपये चार्ज घेतो.

‘या’ व्यक्तीला कशी सुचली आयडिया

जपानची लोकसंख्या 37 मिलियनहून अधिक आहे, परंतु येथील बहुतेक शहरांमध्ये लोक आपल्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या प्रियजनांसाठी वेळ नाही. यामुळे लाखो-कोटी लोकांना एकटे राहावे लागतेय. अशा लोकांना कधी कधी अनेक ठिकाणी कोणाचीतरी सोबत हवी असते. लोकांची हीच गरज लक्षात घेत मोरिमोटोने 2018 मध्ये हा अनोखा बिजनेस सुरू केला. त्याने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हे काम सुरू केले आणि हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढू लागली. त्याचे आता ट्विटरवर 250,000 फॉलोअर्स आहेत.

कशाप्रकारे केली त्याने कामाला सुरुवात

जून 2018 मध्ये मोरिमोटोने ट्विटरवर आपली सेवा ऑफर करताना लिहिले, “मी स्वत:ला भाड्याने देण्यासाठी इच्छूक आहे, मी एक असा व्यक्ती आहे जो काहीच करत नाही. तुम्हाला एकट्याने खरेदीला जाणे कंटाळवाणे वाटते का? तुम्हाला तुमच्या टीममधील एक खेळाडूला मिस करता का? तुम्ही स्वत:ला स्पेस देण्यासाठी कोणाची गरज आहे का? तुम्हाला कुठेतरी पार्टीला जाण्यासाठी कोणीतरी सोबतं हवं आहे का? जर तुमचे उत्तर होय असेल तर संपर्क करा. मला सोप्या गोष्टी करायच्या आहेत, त्याशिवाय मी दुसरे काही करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांचा पत्ता कट?

First Published on: August 26, 2022 2:32 PM
Exit mobile version