जपानमध्ये मुसळधार पावसामुळे मृतांच्या संख्येत वाढ

जपानमध्ये मुसळधार पावसामुळे मृतांच्या संख्येत वाढ

जपान येथील पूरपरिस्थिती

जपानची राजधानी टोकिओत मुसळधार पाऊस आणि जमीन धसल्यामुळे मृतांची संख्या वाढून आतापर्यंत १५६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य अद्यापही सुरु असून अद्यापही पुराची स्थिती कायम आहे. सतत धार होत असणाऱ्या पावसाचा फटका जपानच्या पश्चिमी भागाला बसला आहे. शहरात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे बचावकार्याला अडथळा येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. रस्त्यावर बोटीच्या माध्यमाने फसलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. कुराशिकी शहरातील घरे जलमय झाल्याने येथील रहिवाशी घराच्या छतावर बसले आहेत. मंगळवार सकाळपासून बचावकार्य करणारे कर्मचारी लोकांच्या घरी जाऊन लोकांना अन्नाची मदत पोहचवतात आहेत.

हिडितो यामानाक संघाचे नेतृत्व करणाऱ्या अधिकारी ६० अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह लोकांची मदत करत आहेत. घरात असलेल्या वृद्धांना वाचवण्यावर अधिक भर दिला जात आहे. शारीरिक अपंगत्व असलेल्या नागरिकांच्या घरात घुसलेल्या पाण्याची पातळी वाढत गेली असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कुराशिकीच्या मोबी जिल्ह्यात पाण्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी पाण्यामुळे वाहून गेलेल्या नागरिकांचा शोध प्रशासनाव्दारे केला जात आहे. ७५ हजारहून अधिक पोलीस शोधकार्य करत आहेत. आतापर्यंत सरकारने मदतकार्यासाठी २० दशलक्ष डॉलर्स चा निधी खर्च केला आहे. हिरोशिमा दुर्घटनेनंतरची ही सर्वात मोठी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.

“अत्यंत वाईट परिस्थीती असून आम्ही सर्वनागरिकांच्या घरात जाऊन त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहोत. काही नागरिक अजूनही फसले आहेत. आम्हाला वेळेचे महत्व असून शक्य तितक्या लोकांना वाचवत आहोत.” बचावर कार्य अधिकारी

First Published on: July 10, 2018 5:07 PM
Exit mobile version