घरमुंबईजपानमधील पावसामुळे ६० जणांचा मृत्यू

जपानमधील पावसामुळे ६० जणांचा मृत्यू

Subscribe

जपानमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अद्याप या पूरामुळे ६० जणांचा मृत्यू झाला असून अनेक भागांमध्ये बचावकार्य सुरू आहे.

जपानमध्ये रविवारी तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून अद्याप ६० जणांचा बळी घेतला आहे. जपानमध्ये जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे महापूराची परिस्थिती निर्माण झाली असून काही भागांमध्ये भूस्खलनाची घटनाही घडली आहे. तेथील पंतप्रधान शिंजो आबे यांनी या प्रसंगाला वेळेसोबतची लढाई असे म्हटले आहे. मुसळधार पावसामुळे जपानमधील क्यूशू आणि शिकोकू द्वीप येथील परिसराला सतर्कतेचा इशारा दिला आहे. यापूर्वी जपानमध्ये अशा प्रकारचा पावसाने धुमाकूळ घातला नसल्याची प्रतिक्रिया येथील स्थानिकांनी दिली असून आजवरची ही सर्वात धोकादायक स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंबंधीची माहिती जपानमधील एका लोकल चॅनेलने जपानी हवामानशास्त्र एजन्सी Japanese Meteorological Agency (JMA) च्या हवाल्याने दिली आहे. पोलिसांनी अद्याप ४८ हजार लोकांना वाचवले असून अग्निशमन विभाग आणि सुरक्षा विभागही बचावकार्यात सहभागी झाले आहेत.

Japan-floods
जपानमध्ये पूर परिस्थिती (प्रातिनिधिक चित्र)

अजूनही अनेक नागरिकांचा शोध लागला नसून काहींना मदतीची आवश्यकता आहे. बचाव कार्य, नागरिकांचा जीव वाचवणे आणि स्थलांतराचे कार्य ही संकटाच्या काळाशी असलेली लढाई आहे.
– शिंजो आबे, पंतप्रधान, जपान

दक्षिण आणि पश्चिम जपानमधील तीव्र कुराशिकी, ओकायामा प्रीफेक्चरच्या परिसरात रहिवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. तेथील JMA ने पश्चिम जपानच्या मोठ्या भागात उच्च पातळीवरील अलर्ट, तर इतर क्षेत्रांत दक्षतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी स्थलांतरीत केले असून आणखी २.३ दशलक्ष लोकांना बाहेर काढण्यासाठी सल्ला देण्यात आला होता. या परिसरातील ९२ लोकांचा शोध लागत नसल्याचे सांगितले जात असून १०० हून अधिक लोकांची या पुरामुळे वाताहत झाल्याचे सांगितले जात आहे. बचावकार्यात ४० हून अधिक हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे.

japan_floodjuly
जपानमध्ये पूर परिस्थिती (प्रातिनिधिक चित्र)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -