जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार; किताब पटकावणारे ठरले पहिले मानकरी

जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार; किताब पटकावणारे ठरले पहिले मानकरी

लेखक जावेद अख्तर

सुप्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार देण्यात आला असून हा पुरस्कार मिळवणारे देशातील ते पहिले मानकरी ठरले आहेत. जावेद अख्तर यांना तर्कसंगत विचार, धर्मनिरपेक्षता, मानव विकास आणि मानविय मुल्यांना महत्त्व देण्याकरता हा पुरस्कार देण्यात आला आहे. सोशल मीडिया असो वा विविध शहरांमध्ये आयोजिक होणारे चर्चासत्र जावेद अख्तर हे सीएए आणि इस्मामोफोबिया सारख्या विषयांवर नेहमीच आपले परखड मत व्यक्त करतात.

हेही वाचा – मिशन बिगीन अगेनचा तिसरा टप्पा सुरु

जावेद अख्तर यांच्या या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांची पत्नी शबाना आझमी यांनी प्रतिक्रिया दिली की, हा पुरस्कार मिळवणारे जावेद अख्तर हे पहिले भारतीय ठरले आहेत. याआधी बिल मेहर आणि क्रिस्टोफर हिचन्स यांना हा पुरस्कार प्रदान झाला आहे. हा खुप मोठा गौरव आहे. अभिनेत्री दिया मिर्झा हिने ट्विटरच्या माध्यमातून जावेद अख्तर यांना शुभेच्छा दिला आहेत.

First Published on: June 8, 2020 9:34 AM
Exit mobile version