घरमहाराष्ट्रमिशन बिगीन अगेनचा तिसरा टप्पा सुरु

मिशन बिगीन अगेनचा तिसरा टप्पा सुरु

Subscribe

मिशन बिगीन अगेनचा तिसरा टप्प्यात राज्य सरकारने परवानगी दिलेल्या इतर नागरिकांसाठी बेस्ट सुविधा सुरु होणार आहे.

केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊनची अधिसूचना जारी करत ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला. मात्र लॉकडाऊन सुरू करतानाच राज्य सरकारने ’मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत तीन टप्प्यात निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत आज (८ जून) तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. शासकीय कार्यालयातील उपस्थितीही आजपासून वाढणार आहे. दुसरीकडे विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा शिक्षणासाठी बंदच राहणार आहेत. मात्र उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी आणि ऑनलाईन शिक्षणासाठी शाळा आजपासून सुरू होणार आहेत.

आजपासून काय सुरु होणार?

सर्व खासगी कार्यालये १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु होणार.

- Advertisement -

राज्य सरकारने परवानगी दिलेल्या इतर नागरिकांसाठी बेस्ट सुविधा सुरु होणार आहे.

खेळाची मैदाने खेळाडूंना सरावासाठी आणि खेळासाठी खुली होतील. मात्र, प्रेक्षकांना मैदानात परवानगी नसेल.

- Advertisement -

सामान्य प्रवाशांसाठी बाईक – १ प्रवासी.

सामान्य प्रवाशांसाठी रिक्षा – १ + २ प्रवासी.

सामान्य प्रवाशांसाठी कार – १ + २ प्रवासी.

जिल्ह्यामध्ये बस प्रवास सुरू होईल. मात्र, या बसमध्ये फक्त ५० टक्के प्रवासीच नेण्याची परवानगी असेल.

जिल्ह्याबाहेर बस प्रवासाची परवानगी पुढील आदेश येईपर्यंत नसेल.

सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनच्या नियमांचे पालन करत सर्व दुकाने खुली ठेवण्याची परवानगी असेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहतील.

दुकानांमध्ये गर्दी दिसल्यास स्थानिक प्रशासन ही दुकाने बंद करू शकेल.


हेही वाचा – खासगी हॉस्पिटलवर पालिकेचे ऑडिटर


या ठिकाणी बंदी कायम

विद्यार्थ्यांसाठी शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार

आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार

मेट्रो, लोकलसेवा बंद राहणार

स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -